Top Newsराजकारण

गोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर; शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती शक्य : प्रफुल पटेल

गोंदिया : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं गोव्यासाठी वेगळा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी गोवा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं सांगितलं आहे. आम्ही तृणमूल किंवा काँग्रेस सोबत आघाडी करणार नसून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं आहे. पटेल यांनी उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीसंदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्लॅन देखील सांगितला. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत आघाडी केली असून पहिल्या टप्प्यात एक जागा लढवणार असून पुढच्या टप्प्यातील माहिती लवकरचं कळेल, असं पटेल म्हणाले. प्रफुल पटेल यांनी गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं सांगितल्यानं आता काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस सोबत युती करण्याच्या आशा मावळल्या असल्याचं दिसून येत आहे.

गोवा राज्यात होणारी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या दरम्यान प्रसार माध्यमांसमोर त्यांनी ही घोषणा केलीय. गोव्यात कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच तृणमूल काँग्रेस मध्ये युती करीत लढणार असल्याचे चिन्ह दिसत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने लढणायची तयारी केली आहे. तर, काही ठिकाणी शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती करुन लढणार असल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत आघाडी

उत्तर प्रदेश मध्ये होत असलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजवादी पक्षा सोबत युक्ती करुन लढत आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक जागा लढवत असून पुढील टप्प्यात आणखी जागांबाबत माहिती समोर येईल, असं प्रफुल पटेल म्हणाले.

मणिपूरमध्ये काँग्रेससोबत युती

मणिपूर विधानसभेची देखील निवडणूक जाहीर झाली असून तिथं दोन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. मणिपूरमध्ये आम्ही काँग्रेससोबत युती करुन लढणार आहोत. मणिपूर मध्ये राष्ट्रवादीला 5 जागा मिळतील, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button