Top Newsराजकारण

ड्रग्ज पार्टीतील भाजपशी संबंधित ३ आरोपींवर एनसीबी मेहेरबान : नवाब मलिक

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी

मुंबई : क्रूझवरील पार्टीत ड्रग्ज नव्हतंच. तसेच मनिष भानुशाली हा भाजपचा पदाधिकारी क्रूझवर पोहोचला कसा? असे बॉम्बगोळे टाकून एनसीबीला अडचणीत आणल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नवा बॉम्ब टाकला आहे. दिल्लीपासून महाराष्ट्रातील नेत्यांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी फोन करुन रिषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला, प्रतिक गाभा यांना सोडण्याचे आदेश दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई-गोवा क्रूझ पार्टीप्रकरणी हल्लाबोल सुरुच ठेवला आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर टाकलेली धाड ही बनावट आणि नियोजित होती. फर्जीवाडा करुन, बातम्या पुरवल्या. १३०० लोकांच्या जहाजावर ११ जणांनाच ताब्यात घेण्यात आलं. त्यापैकी तिघांना का सोडण्यात आलं असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

इतकंच नाही तर नवाब मलिक यांनी एनसीबीचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली आहे. तसंच समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांनी तिघांना सोडून दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. दिल्लीपासून महाराष्ट्रातील नेत्यांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी फोन करुन रिषभ सचदेवा, आमीर फर्निचरवाला, प्रतिक गाभा यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले, असं म्हणत नवाब मलिकांनी तीन नावं घेतली. इतकंच नाही तर त्यांनी युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंबोज आता मोहित भारतीय म्हणून नाव आता लावतात. त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार, मोहित कुंभोज हे त्यांचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना सोडवण्यासाठी एनसीबी कार्यालयात गेले होते, असंही नवाब मलिक म्हणाले.

युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंभोज आता मोहित भारतीय म्हणून नाव आता लावतात. त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. मोहित कुंबोज हे त्यांचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना सोडवण्यासाठी एनसीबी कार्यालयात गेले होते, त्यांच्यासोबत त्यांचे वडील, त्यांचे काकाही होते.

प्रतीक गाभा आणि आमीर फर्निचरवाला यांची नावं कोर्टात उल्लेख करण्यात आला. या दोघांच्या बोलावण्यावरुन आर्यन खान तिकडे गेले होते. १३०० लोकांच्या जहाजावर रेड टाकली, रात्री १२ तास रेड टाकण्यात आली, त्यापैकी ११ लोकांना ताब्यात घेतलं, या सर्वांना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. त्यानंतर तीन जणांना सोडण्यात आलं, ते कुणाच्या आदेशावरुन हे एनसीबीने सांगावं.

दिल्लीपासून महाराष्ट्रातील नेत्यांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी फोन करुन रिषभ सचदेवा, आमीर फर्निचरवाला, प्रतिक गाभा यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले. १३०० लोकांपैकी ११ लोकांना पकडण्यात आलं तर तिघांना का सोडलं हे सांगा. समीर वानखेडेंनी याचा खुलासा तत्काळ करावा. १३०० पैकी ११ लोकांनाच का पकडलं, ३ जणांना का सोडलं, कोणत्या माहितीवरुन का सोडलं हे सांगावं.

व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुन पुढे तपास सुरु आहे. तीन लोकांना का आणि कसं सोडलं. छापेमारीचं काम हे पूर्णपणे बनावट आहे. प्लॅन करुन छापा टाकला, प्लॅन करुन बातम्या पुरवल्या, प्लॅन करुनच लोकांना फसवण्यात आलं. ते निर्दोष आहेत की गुन्हेगार आहेत हे न्यायालयात ठरवलं जाईल. पण तिघांना का सोडलं हा आमचा सवाल आहे.

आमची मुंबई पोलिसांकडे मागणी आहे, चौकशी करा, समीर वानखेडेंची कॉल डिटेल घ्या, ज्चा तिघांना सोडण्यात आलं, वडील आणि काका हे एनसीबी ऑफिसमध्ये गेले याबाबत शंका आहे, समीर वानखेडेंसोबत भाजपच्या नेत्यांचं बोलणं झालं आणि त्यानंतर सोडण्यात आलं हे कॉल डिटेलमध्ये समोर येईल.

भाजपवर टीका करून सत्य लपत नसते; केशव उपाध्ये

मलिकांच्या या टीकेला आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पलटवार केलाय. नवाब मलिक मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते. तथापि, मीडिया ट्रायलमध्ये भारतीय जनता पार्टीवर टीका करून कोणी निर्दोष ठरणार नाही आणि सत्यही लपणार नाही. असत्याची कास धरून स्वतःला आरोपी करू नका, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला.

अंमलीपदार्थांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या एनसीबीने एका जहाजावर छापा मारून काहीजणांना पकडले. याबाबत राज्याचे नवाब मलिक पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मीडिया ट्रायल चालवत आहेत आणि आरोपींना मदत होईल, अशा रितीने तपासी यंत्रणेवर टीका करत आहेत. त्यामध्ये ते पुन्हा पुन्हा भारतीय जनता पार्टीलाही ओढत आहेत. पण अशा रितीने भाजपावर टीका करून आरोपींची सुटका होऊ शकत नाही. त्यासाठी न्यायालयानेच निकाल द्यावा लागतो. तपासी यंत्रणेला सातत्याने न्यायालयासमोर उभे रहावे लागत आहे. भाजपाचे कोणी दोषी असेल तर त्यालाही शिक्षा होईलच, असंही उपाध्ये म्हणाले.

उपाध्ये म्हणाले की, नवाब मलिक यांनी हे ध्यानात घ्यायला हवे की अटक केलेल्या आरोपींना एनसीबी कोठडीत ठेवायचे का, न्यायालयीन कोठडीत म्हणजे तुरुंगात पाठवायचे का किंवा जामीन द्यायचा याचा निवाडा न्यायालय करत आहे. त्या निमित्ताने तपासकामाची पडताळणी न्यायालयात होत आहे. नवाब मलिक यांना वकिली करायची हौस असेल तर न्यायालयात जावे आणि आपले म्हणणे मांडावे. पण ते प्रत्यक्ष न्यायालयात न जाता केवळ मीडिया ट्रायलमधून तपासकामाबद्दल संशय निर्माण करत आहेत. ते विनाकारण भाजपला यामध्ये ओढत आहेत. असे करून त्यांच्या मनाचे समाधान होईल पण आरोपींची सुटका होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button