राजकारण

नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंवर आणखी ‘ट्विट हल्ला’ !

मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानची जामिनीवर सुटका झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा हल्लाबोल सुरूच आहे. मलिक यांनी आता आणखी एक फोटो ट्विट केला असून ही व्यक्ती कोण आहे? असा सवाल करत समीर वानखेडे यांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

नवाब मलिक यांनी एकापाठोपाठ आरोपांची मालिका सुरू केल्यामुळे एनसीबी आणि समीर वानखेडे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. नवाब मलिक यांनी आज संध्याकाळी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एका व्यक्तीचा फोटो आहे. ही व्यक्ती कोण आहे असा सवाल मलिक यांनी उपस्थितीत केला आहे. हा फोटो अब्दुल अझीझचा असल्याची माहिती समोर आली आहे. अब्दुल अझीझ याचं नाव हे समीर वानखेडे यांच्या पहिल्या निकाह नाम्यात आहे. तसंच, अब्दुल अझीझ आणि यास्मिन वानखेडे यांचं लग्न झालं होतं. पण त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता. या दोघांना एक १० वर्षांचा मुलगा असल्याची माहिती सध्या तो इटलीमध्ये आहे, असं वृत्त एका वृत्तवाहिनीनं दिलं आहे.

मलिक यांनी याआधीही यास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. एनसीबीने कारवाई दरम्यान बनवलेला पंच फ्लेचर पटेल कोण आहे? तसेच फ्लेचर पटेलसोबत फोटोत असणारी लेडी डॉन कोण आहे? असा सवालही नवाब मलिक यांनी विचारला होता. फ्लेचर पटेल लेडी डॉनच्या सोबत फिल्म इंडस्ट्रीत काय दहशत निर्माण करत आहेत? इंडस्ट्रीत दहशत निर्माण करुन पैसे उकळण्याचे काम करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मी एनसीबीला सांगतो की एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा करावा, असंही मलिक म्हणाले होते. मलिक यांच्या आरोपानंतर यास्मिन वानखेडे समोर आल्या होत्या. मलिक यांनी ज्या लेडी डॉनचा उल्लेख केला होता त्याच यास्मिन वानखेडे असल्याचं सांगितलं जात आहे. त्या मनसेच्या पदाधिकारी आणि वकील आहे. मनसेनं त्यांची पाठराखण केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button