Top Newsराजकारण

नथुराम गोडसेने महात्मा गांधीजींचा वध केला; नाना पटोलेंचे धक्कादायक वक्तव्य

मुंबई : गेल्या काही दिवासांपासून नाना पटोले त्यांच्या खळबळजनक विधानांमुळे वादात सापडले असताना, आज नाना पटोलेंनी पुन्हा एक खळबळजनक वक्तव्य केलं. आज महात्मा गांधींबाबत बोलताना नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा वध केला असं वक्तव्य केल्याने पुन्हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण हत्येऐवजी वध या शब्दावर अनेकांनी आक्षेप घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे नाना पटोले पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावरून नाना पटोले भाजपच्या टीकेचा सामना करत आहेत. भाजपने अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारीही केल्या आहेत, तसेच दोन दिवसांपूर्वीच भाजपने नाना पटोलेंना मनोरुग्णाचे औषध पाठवले होते आणि आता नानांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र गोडसेच्या मते गांधींचा वध झाला, अशा अर्थाने मी ते वाक्य बोललो होते, असे स्पष्टीकरणही नाना पटोलेंनी भाषणानंंतर दिलं आहे.

गांधी पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे गांधींना आदरांजली वाहण्यात आली, यावेळी भजन गायनही झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राष्ट्रीय किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष श्याम पांडे, प्रदेश काँग्रेसचे संघटन सरचिटणीस देवानंद पवार, सरचिटणीस राजेश शर्मा, राजन भोसले, मुनाफ हकीम, यशवंत हाप्पे, सरचिटणीस व प्रवक्त्या भावना जैन, प्रवक्ते अरुण सावंत, भरतसिंह आदी उपस्थित होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आजच्याच दिवशी नथुराम गोडसे नावाच्या आतंकवाद्याने वध केला. महात्मा गांधी संपले असे हिंदुत्ववादी व्यवस्थेला वाटत असेल पण महात्मा गांधी आजही त्यांच्या विचाराने जिवंत आहेत व त्यांचे विचार भविष्यातही जिवंत राहतील. गांधी विचार देशाने तसेच जगाने स्विकारलेला आहे तो कधीही संपणारा नाही. हा देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचारानेच चालेल, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, खा. राहुलजी गांधी यांनी गांधी पुण्यतिथीनिमित्त केलेले ट्विट योग्यच आहे. गांधी विचारांना संपवण्याचा अनेकदा प्रयत्न केला गेला पण गांधी विचार या देशात रुजलेला आहे. हाच विचार आजच्या पिढीत रुजवण्याचा आपण संकल्प करुयात. या देशाला गांधींजीनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधीजींची अहिंसेची शिकवण जगाने स्विकारलेली आहे. गांधी एक व्यक्ती नसून तो विचार आहे तो विचारच देशाला तारणारा आहे. ब्रिटिशांविरोधात मोठा संघर्ष केल्यानंतर मिळालेले हे स्वातंत्र्य आज धोक्यात आल्याची परिस्थिती देशात निर्माण झाली आहे त्यामुळे स्वातंत्र व संविधान अबाधित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल खोटा इतिहास सांगून त्यांना खलनायक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा अपप्रचार थोपवण्यासाठी सजग रहा, सतर्क रहा. स्वातंत्र्याच्या लढाईप्रमाणे गांधी विचाराची लढाई सुरु ठेवा, असे आवाहनही पटोले यांनी केले. मात्र हे बोलताना वध हा शब्द वापरल्याने पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

गांधी एक व्यक्ती नसून तो विचार आहे तो विचारच देशाला तारणारा आहे. ब्रिटिशांविरोधात मोठा संघर्ष केल्यानंतर मिळालेले हे स्वातंत्र्य आज धोक्यात आल्याची परिस्थिती देशात निर्माण झाली आहे त्यामुळे स्वातंत्र व संविधान अबाधित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल खोटा इतिहास सांगून त्यांना खलनायक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा अपप्रचार थोपवण्यासाठी सजग रहा, सतर्क रहा. स्वातंत्र्याच्या लढाईप्रमाणे गांधी विचाराची लढाई सुरु ठेवा, असे आवाहनही पटोले यांनी केले.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या आत्मक्लेशाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पटोले म्हणाले की, खासदार अमोल कोल्हे हे डॉक्टर आहेत. कलाकार म्हणून त्यांनी कोणती भूमिका करावी हे त्यांचे स्वातंत्र्य आहे, पण त्यांच्यासमोर जेव्हा नथुराम गोडसेच्या भूमिकेची स्क्रिप्ट आली त्यावेळीच त्यांना समजायला हवे होते. नथुरामला नायक दाखवून महात्मा गांधींना खलनायक ठरवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे तो मात्र आम्ही कदापी खपवून घेणार नाही म्हणूनच ‘व्हाय आय किल्ड गांधी?’ हा चित्रपट कोठेही प्रदर्शित होऊ नये अशी आम्ही मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्याकडे मागणी केली आहे.

पटोले यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज – बावनकुळे

पुन्हा एकदा नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे हे आमने -सामने आल्याचे पहायला मिळत आहे. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. नाना पटोले हे नेहमीच वादग्रस्त व्यक्तव्य करत असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसची देखील प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button