राजकारण
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल
मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखण्याचा त्रास जाणवत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला महापौरांच्या कार्यालयातूनही दुजोरा देण्यात आला आहे. त्यांच्या तब्येतीबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी कोसळलेल्या दरडींमुळे आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. याच घटनांचा किशोरी पेडणेकर यांनी आज सविस्तर आढावा देखील घेतला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधून घडलेल्या घटनांची माहिती देखील दिली होती.