मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. २ जानेवारी, २०२२ रोजी २९० पदांसाठी परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षा दिनांक ७, ८ व ९ मे, २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी व मुख्य परीक्षा दिनांक ७, ८ व ९ मे, २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत येणारे एकूण २९० पदांच्या भरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ घेण्यात येणार आहे. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी २ वाजल्यापासून ते २५ ऑक्टोबर २०२१ रात्री ११:५९ पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करायचे आहेत. हे सर्व अर्ज परीक्षा शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम, इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशीलासाठी आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे व सविस्तर जाहिरातीचे कृपया अवलोकन करावे.