Top Newsराजकारण

खा. रामदास तडस यांच्या मुलाचा अखेर पूजासोबत वैदिक पद्धतीने विवाह

आम्हाला भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय नाही : चाकणकर

वर्धा : भाजप खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस यांनी अखेर पूजाशी वैदिक पद्धतीनं विवाह केलाय. आपल्या घरीच अगदी साध्या पद्धतीनं हा विवाह सोहळा पार पडलाय. खासदार तडस यांची सून पूजा हिचा एक व्हीडिओ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केला होता. त्यात तडस यांच्या सुनेनं आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर मारहाण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसंच चाकणकर यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. दरम्यान, तडस यांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अखेर संध्याकाळच्या सुमारास पंकज तडस आणि पूजा यांचा विवाह पार पडला आहे.

हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर पूजा यांनी आता आपली कुठलीही तक्रार नसल्याचं म्हटलंय. त्यांनी आपली तक्रारही मागे घेतली आहे. सकाळी मी खूप पॅनिक झाले होते. सकाळी माझ्या गाडीसमोरुन कुणीतरी गेलं त्यावेळी मला खूप भीती वाटली होती आणि त्यामुळे आपण ती तक्रार केली होती. आता पंकज यांच्याबद्दल आपली कुठलीही तक्रार नाही असं पूजा यांनी म्हटलंय.

पंकज तडस यांनी आपण आधाही खूश होतो आताही आहोत. आपण यापूर्वीही पूजाला स्वीकारलेलं होतं आणि आताही स्वीकारतो आहे. पूजाशी मी लग्न केलं होतं. पण आता त्यांच्या इच्छेनुसार वैदिक पद्धतीनं लग्न केलं आहे. या प्रकरणात काही लोकांनी राजकीय सुपारी घेतली होती तो प्रश्न आता मिटला आहे. माझ्या वडिलांनी मला वर्षभरापासून बेदखल केलेलं आहे. माझ्या वडिलांचा आणि माझा कोणताही संबंध नाही. माझ्या वडिलांना आणि माझ्या परिवाराला गोवण्याचं काम सुरु आहे. ६ ऑक्टोबर २०२१ ला माझं लग्न झालं होतं. त्याचं प्रमाणपत्र आपल्याकडे आहे. आता त्यांच्या विनंतीनुसार वैदिक पद्धतीनं लग्न केल्याचं पंकज तडस यांनी म्हटलंय.

पूजा तडस यांनी व्हीडिओत काय म्हटलं होतं?

रुपाली चाकणकर यांनी आपल्या स्वत:च्या अकाऊंटवरुन व्हीडिओ ट्विट केला आहे. हा व्हीडिओ भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा यांचा असल्याचा दावा चाकणकर यांचा आहे. हा केवळ १२ सेकंदांचा व्हीडिओ आहे. या व्हीडिओतील महिला म्हणते, “मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते”

आम्हाला भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय नाही : चाकणकर

भाजपचे खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज तडस यांनी अखेर पूजाशी लग्न केलं आहे. लग्नानंतर पंकज यांनी काही लोकांनी राजकीय सुपाऱ्या घेऊन आम्हाला बदनाम केल्याचा आरोप केला. त्याला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. पूजाने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारा व्हीडिओ व्हायरल केला म्हणून पंकज यांना पूजाशी लग्न करावं लागलं, असं सांगतानाच आम्हाला भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय नाही, असा जोरदार हल्ला रुपाली चाकणकर यांनी चढवला आहे.

कोणतीही मुलगी स्वत:चा संसार किंवा स्वत:चं वैयक्तिक आयुष्य कधीच चव्हाट्यावर आणत नाही. तिने वर्धा पोलिसात तक्रार दाखल केली होती. केवळ राजकीय दबावामुळे कारवाई झाली नाही. म्हणून नागपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्यांच्या सर्व तक्रारी माझ्याकडे आहेत. विवाह प्रमाणपत्रंही माझ्याकडे आहे. तिला खूप त्रास होत होता म्हणून तिने व्हीडिओतून आपली वेदना मांडली. त्यामुळे त्यांना विवाह करावा लागतोय. यात सुपारी वगैरे घेण्याची आम्हाला भाजप सारखी सवय नाही. त्यांच्या महिला पदाधिकारी कदाचित अशा पद्धतीने षडयंत्र रचत असतील. आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आहोत. ते आमचे संस्कार नाहीत. ते भाजपचे संस्कार आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button