इतर

मोहन भागवत यांना कोरोनाची लागण

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कोरोनाची लक्षणे सामान्य आहेत, परंतु खबरदारी म्हणून नागपूरच्या किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरएसएसच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली.

सरसंघचालक मोहन भागवत यांना काल शुक्रवारी सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांची तातडीने चाचणी करण्यात आली. त्यांची आरटीपीसीआर करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना नागपूरच्या किंग्जवे हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे.

भागवत यांना करोना झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहे. गडकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालत आदरणीय डॉ. मोहनजी भागवत हे करोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. लवकरात लवकर त्यांना बरे वाटावे, अशी देवाकडे प्रार्थना करतो.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button