मोदींनी सत्तेच्या भुकेसाठी पुलवामा घटना घडवली; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त ट्विट
नवी दिल्ली : काँग्रेस नेते उदित राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत वादग्रस्त ट्विट केले आहे. सत्तेच्या भुकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुलवामा घटना घडवून आणल्याचे ट्विट उदित राज यांनी केले आहे. यावर भाजपने उदित राज यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेस नेते उदित राज यांनी ट्विट केले आहे की, पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेच्या नावाखाली ढोंगी आणि पुजाऱ्यांचे दुकान सुरू झाले आहे. तर उदित राज यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नौटंकीमुळे आता पुष्टी झाली आहे की, सत्तेच्या भुकेसाठी पुलवामा घटना स्वतःच घडवून आणली गेली आहे.
भाजपाई नेता जब कांग्रेस पार्टी पर बिना किसी सबूत के ‘‘खूनी इरादे’ जैसे अनर्गल आरोप लगा सकते हैं तो प्रधानमंत्री जी से पुलवामा कांड पर सवाल क्यों नहीं किया जा सकता?@INCIndia pic.twitter.com/N5Q3daQ9Ze
— Dr. Udit Raj (@Dr_Uditraj) January 8, 2022
दरम्यान, आपल्या वादग्रस्त ट्विटवर उदित राज यांनी म्हटले आहे की, फिरोजपूरमध्ये जे काही घडले त्याला नौटंकी म्हटले जाईल, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोणीही गोळीबार किंवा दगडफेक केली नाही, मग मी वाचलो असे ते का म्हणाले? विनाकारण या प्रकरणाचा भडिमार केला जात आहे.
पी एम मोदी की नौटंकी ने अब पुख्ता कर दिया कि सत्ता की भूख के लिए पुलवामा कांड खुद कराया।
— Dr. Udit Raj (@Dr_Uditraj) January 8, 2022
पीएम मोदी की सुरक्षा की नौटंकी की आड़ में पाखंडियों का झाड़ – फूंक और पूजा -पाठ की दुकान चल पड़ी।
— Dr. Udit Raj (@Dr_Uditraj) January 8, 2022
न मोदी जी के पास प्रदर्शनकारी पहुंचे, न गाली किसी ने दिया, न ईंट व पत्थर चला, न गोली चली, न डंडा- लाठी चला तो कैसे उनकी जान का खतरा था। उनकी गाड़ी को गोली भी भेद नही सकती। महान नाटक कार ….@INCIndia
— Dr. Udit Raj (@Dr_Uditraj) January 7, 2022
काँग्रेस नेते उदित राज यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, काँग्रेस नेते सोनिया गांधींच्या सांगण्यावरून अशी विधाने करत आहेत. मी असेही म्हणू शकतो की, राहुल गांधी चीनमधून पैसे घेतात. सोनिया गांधींना पाकिस्तानातून लोकशाही कमकुवत करण्याच्या सूचना मिळतात. पण पुराव्याशिवाय आम्ही कोणावरही निराधार आरोप करत नाही. उदित राज भाजपमध्ये असताना काँग्रेसवर आरोप करायचे, आता काँग्रेसमध्ये गेले आहेत, त्यामुळे भाजपवर आरोप करत आहेत.