अर्थ-उद्योगशिक्षण

कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्रालयाचा आयजीएनओयूसोबत सामंजस्‍य करार

नवी दिल्‍ली : व्‍यावसायिक व टेक्निकल प्रशिक्षण आराखड्याला अधिक प्रबळ करण्‍यासाठी कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्रालयाने कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्रालयाने आज इंदिरा गांधी ओपन युनिव्‍हर्सिटी (आयजीएनओयू) सोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली. या सहयोगाचा दर्जेदार शिक्षणामध्‍ये व्‍यावसायिक शिक्षण व प्रशिक्षणाची भर करण्‍याचा आणि भारतीय तरूणांसाठी उत्तम रोजगार संधींसाठी मार्ग निर्माण करत त्‍यांना रोजगारक्षम बनवण्‍याचा मनसुबा आहे. राष्‍ट्रीय कौशल्‍य प्रशिक्षण संस्‍था (एनएसटीआय), औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था (आयटीआय), प्रधानमंत्री कौशल केंद्रे (पीएमकेके) आणि जन शिक्षण संस्‍थान (जेएसएस) यांच्‍याशी संलग्‍न प्रशिक्षणार्थींना या उपक्रमाचा लाभ होईल. या उपक्रमाचा विद्यार्थ्‍यांना सर्वोत्तम उदरनिर्वाहाच्‍या संधी मिळण्‍यासाठी दर्जेदार शिक्षण घेण्‍यामध्‍ये सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे.

या सहयोगांतर्गत ३२ एसटीआय, ३,००० हून अधिक सरकारी आयटीआय, ५०० पीएमकेके आणि जवळपास ३०० जेएसएस प्रत्‍यक्ष प्रशिक्षणासाठी नोंदणी केंद्रे, परीक्षा केंद्रे व कार्य केंद्रे म्‍हणून आयजीएनओयूशी संलग्‍न असतील. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांना आता आयजीएनओयूच्‍या तीन-वर्ष पदवी अभ्‍यासक्रमामध्‍ये सामील होण्‍याची संधी मिळेल. या उपक्रमाच्‍या प्रगतीवर देखरेख ठेवण्‍यासोबत अवलोकन करण्‍यासाठी एमएसडीई व आयजीएनओयू या दोन्‍ही संस्‍थांचे प्रतिनिधी असलेली प्रोजेक्‍ट स्‍टीअरिंग कमिटी असेल. हा सामंजस्‍य करार १० वर्षे कालावधीसाठी असून परस्‍पर करारानुसार त्‍यामध्‍ये नूतनीकरण करण्‍याच्‍या अधीन आहे. हा सामंजस्‍य करार २०३५ पर्यंत दर्जेदार शिक्षणासह व्‍यावसायिक शिक्षणामधील ग्रॉस एनरॉलमेंट रेशो (जीईआर) ५० टक्‍क्‍यांपर्यत वाढवण्‍यासाठी सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट गोल ४.४ आणि राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० शी संलग्‍न आहे.

कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आणि म्‍हणाले, ”भारताचा तरूण डेमोग्राफिक लाभांश आर्थिक प्रगतीचे इंजिन आहे आणि त्यांना दर्जेदार शिक्षणासोबत कौशल्‍य व व्‍यावसायिक प्रशिक्षण मिळण्‍यासाठी अर्थपूर्ण मार्ग उपलब्‍ध होण्‍याची गरज आहे. या उपक्रमाचा याच दिशने वाटचाल करण्‍याचा मनसुबा आहे. हा उपक्रम तरूणांना आवश्‍यक पात्रतांसह उच्‍च सामाजिक व आर्थिक गतीशीलता देतो. आपले माननीय पंतप्रधान यांचा भारतीय तरूणांच्‍या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्‍याचा आणि त्‍यांना भावी रोजगारासाठी सुसज्‍ज करण्‍याचा दृष्टिकोन आहे. हा उपक्रम याच दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे. एक संस्‍था म्‍हणून आयजीएनओयूने सर्वसमावेशक माहितीपूर्ण वातावरण निर्माण करण्‍याचा सतत प्रयत्‍न केला आहे. मला आशा आहे की, हा सहयोग भारतीय तरूणांना त्‍यांची क्षमता अधिक निपुण करण्‍याची आणि त्‍यांच्‍या भविष्‍याला आकार देण्‍याची संधी देईल. सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये हा संयुक्‍त उपक्रम आयजीएनओयू केंद्रे म्‍हणून घोषित करण्‍यात आलेल्‍या ३२ एनएसटीआयमध्‍ये राबवण्‍यात येईल. ज्‍यामध्‍ये परदेशी भाषा प्रशिक्षण, कौशल्‍य-आधारित आरोग्‍यसेवा शिक्षण, फॅशन डिझाइनिंग अशा कौशल्‍यांवर आधारित कोर्सेसचा समावेश असेल.”

एमएसडीईचे संचालक (सीबीसी) डॉ. बी. के. राय आणि आयजीएनओयूचे कुलसचिव डॉ. व्‍ही. बी. नेगी यांनी सामंजस्‍य करारावर स्‍वाक्ष-या केल्‍या.

आयजीएनओयूचे कुलगुरू प्रा. नागेश्‍वर राव म्‍हणाले की, आयजीएनओयू या योजनेच्‍या यशस्‍वी अंमलबजावणीसाठी आपले २१ स्‍कूल्‍स ऑफ स्‍टडीज व ५६ रिजिनल सेंटर्सच्‍या माध्‍यमातून सर्व आवश्‍यक साह्य करेल. आयजीएनओयू दर्जात्‍मक हमीसाठी मानक विकसित करेल, विद्यार्थ्‍यांच्‍या नोंदणींना सुविधा देण्‍यासाठी समुपदेशन व प्रशिक्षक प्रशिक्षण उपक्रम विकसित करेल, नोंदणी व समुपदेशनाची हाताळणी करण्‍यासाठी निवडलेल्‍या केंद्रांच्‍या कर्मचा-यांना प्रशिक्षण देईल आणि एनएसटीआय, आयटीआ, पीएमकेके व जेएसएस यांच्‍या व्‍यवस्‍थापनावर देखरेख ठेवेल. तसेच आयजीएनओयू डिजिटल स्‍वरूपात सेल्‍फ-लर्निंग मटेरिअल (एसएलएम) देखील देईल, व्‍यापक मूल्‍यांकन करेल आणि स्‍वत:च्‍या घटकांसाठी टर्म व परीक्षा आयोजित करत यशस्‍वी विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्रे जारी करेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button