अर्थ-उद्योग

पीएनबी घोटाळ्यातील मेहुल चोक्सी अँटिग्वामधूनही बेपत्ता

मुंबई : पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी फरार असलेला हिऱे व्यावसायिक मेहुल चोक्सी फरार झाला आहे. अँटिग्वा पोलिस त्याचा शोध घेत आहे. यासंदर्भातील माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली आहे. यावेळी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि अंमलबजावणी संचालनालयाला पाहिजे असलेला फरार मेहुल चोक्सी अँटिगा आणि बार्बुडामध्ये बेपत्ता झाला आहे. पहिल्यांदाच, चोक्सीचे वकील अ‍ॅड. विजय अग्रवाल यांनी मेहुल चोक्सी बेटांच्या देशात बेपत्ता झाल्याची पुष्टी केली आहे.

दरम्यान, मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोमवारी मेहुल चोक्सी घरातून एका रेस्टॉरॉंटमध्ये जाण्यासाठी निघाला होता मात्र त्यानंतर परतलाच नसल्याचे विजय अग्रवाल यांनी सांगितले. यासंदर्भातील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीत असे म्हटले की, अँटिग्वामध्ये पोलिसांनी मेहुल चोक्सीचा शोध सुरू केला आहे. अशी बातमी आहे की चोक्सी या बेटाच्या दक्षिणेकडील भागातील एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या जेवणासाठी जाण्यासाठी संध्याकाळी घराबाहेर पडले आणि पुन्हा कधीही दिसला नाही. त्याचे वाहन संध्याकाळी जॉली हार्बरमध्ये सापडले, परंतु तिथे तो नव्हता. मेहुल चोक्सी बेपत्ता असून त्याचे कुटुंबिय चिंतेत आहेत. कुटुंबियांनी चर्चेसाठी मला बोलावलं आहे. अँटिग्वा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हिरे व्यावसायिक आणि गीतांजली समुहाचा मालक असलेल्या मेहुल चोक्सीला सीबीआय आणि ईडीने वाँटेड घोषित केलं आहे. मेहुल चोक्सीने घोटाळा उघडकीस येण्याआधी ४ जानेवारी २०१८ ला देशातून पळ काढला होता. त्याने अँटिग्वा जाण्याआधी १३ हजार ५७८ कोटींचा पीएनबी घोटाळ्यात तब्बल ७ हजार ८० कोटींचा फेरफार केला. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात चोकसी विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. २०१३ मधील शेअर बाजार घोटाळ्यातही त्याचे नाव होते. पीएनबीमध्ये घोटाळ्यानंतर तो देश सोडून पळाला होता. गेल्या वर्षी एक आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची देखील माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button