Top Newsअर्थ-उद्योग

अखेर रतन टाटांचे संरक्षणक्षेत्रात पाऊल; एअरबससोबत हवाई दलासाठी विमाने बनविणार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने ‘सी-२९५’ या ५६ मालवाहतूक विमानांच्या खरेदीसाठी स्पेनच्या एअरबस डिफेन्स अँड स्पेससोबत जवळपास २२००० कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. संरक्षणावरील कॅबिनेट कमिटीने यासाठी नुकताच हिरवा झेंडा दाखविला होता. महत्वाचे म्हणजे ही विमाने भारतात बनविण्यात येणार असून टाटा सोबत मिळून एअरबस या विमानांचे उत्पादन करणार आहेत. राफेलनंतर हा दुसरा मोठा व्यवहार आहे जी भारतीय कंपनीसोबत मिळून केला जाणार आहे.

या व्यवहारामुळे येत्या काही वर्षांत भारतात ६००० हून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच देशात हवाई क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान येणार आहे. संरक्षण मंत्रालयानुसार हा एकप्रकारचा पहिलाच असा प्रकल्प आहे ज्यामध्ये खासगी कंपनी लष्करासाठी विमान बनविणार आहे. आतापर्यंत हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएमत) कडे ही जबाबदारी होती. आता पहिल्यांदा खासगी कंपनी लष्करासाठी लष्करी विमाने बनविणार आहे.

या व्यवहारानुसार १६ विमाने एअरबस डिफेन्स स्पेनवरून आयात केले जाणार आहेत. अन्य विमाने टाटाच्या प्रकल्पात पुढील १० वर्षांत बनविण्यात येणार आहेत. यासाठी हैदराबाद आणि बंगळूरूच्या आसपास जागा शोधण्यात येत आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील प्रकल्प उभा करता येऊ शकतो. सी-२९५ विमाने हवाई दलाच्या जुनाट झालेल्या एवरो-७४८ विमानांची जागा घेतील. पुढील ४८ महिन्यांत १६ विमाने भारताला मिळतील. उर्वरित ४० विमाने भारतात बनविली जातील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button