शिक्षण

ताण कमी करून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी ध्यानधारणा

मुंबई : हार्टफुलनेस आणि एमएससीईआरटी (महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) संयुक्तपणे ‘हार्टफुलनेस पद्धतीने परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन’ हा उपक्रम राबवित आहेत, जो विद्यार्थ्यांना आगामी बोर्डाच्या परीक्षांचा कठीण काळ योग्य रीतीने हाताळण्यासाठी मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम बनविण्यास मदत करेल. हा पाच दिवसांचा ऑनलाईन कार्यक्रम मराठीमध्ये असेल व तो एमएससीईआरटीच्या यूट्यूब चॅनेल वर उपलब्ध असेल.

विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ एम एस सी ई आर टी च्या यूट्यूब चॅनेलवर मराठीतील ऑनलाईन सत्रांद्वारे, विनामूल्य घेता येईल. महाराष्ट्र शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या उपक्रमाचे समर्थन करत विद्यार्थ्यांना त्यात भाग घेऊन लाभ मिळवण्यास प्रोत्साहित केले आहे पहिल्या तीन दिवसांची सत्रे येथे उपलब्ध आहेत.

‘हार्टफुलनेस पद्धतीने परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन’ हा अत्यंत आवश्यक असा कार्यक्रम असून तो आगामी बोर्डाच्या परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना ध्यानाच्या माध्यमातून परीक्षेच्या तणावावर मात करून उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम बनवेल. ‘हार्टफुलनेस पद्धतीने परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन’ ही पाच दिवसांची ऑनलाइन सत्रांची मालिका असून त्यात हार्टफुलनेस ध्यान तसेच तणावाचे व्यवस्थापन आणि त्यावर मात करण्याची तंत्रे शिकवली जातात.

हार्टफुलनेस पद्धतीने परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन’ या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळणारे मुख्य फायदे

तणाव तणावाचे शास्त्र व त्याची गरज; इच्छाशक्ती व लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढविणे.
धैर्य धैर्य व आत्मविश्वास कसा वाढवायचा; भीती, शंका व प्रतिक्षिप्त क्रिया कशा हाताळायच्या.
लवचिकपणा लवचिक बनून बदलास कसे सामोरे जायचे; निर्णय क्षमता आत्मपरीक्षणाची गरज.
वेळ वर्तमान काळात राहणे; वेळेचा सदुपयोग; तयारी व ध्येयाच्या दिशेने नियोजितपणे काम करणे.
शिस्त अभ्यासात रस घ्या. ठराविक दिनक्रम ठेवा; स्वयंशिस्त आणि स्वतःवर काम करा.
महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड या कार्यक्रमाविषयी बोलताना म्हणाल्या, “राज्यातील इ.१० वी व इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे तर्फे आत्मविश्वास वाढविण्यासाठी व परीक्षेचा ताणतणाव कसा हाताळावा यासाठी विशेष सत्रांचे आयोजन दि.२९ ते ३१ मार्च २०२१ च्यादरम्यान https://bit.ly/3w5kOu6 या YouTube चॅनल वर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.”

दर वर्षी परीक्षा हा विद्यार्थ्यांसाठी तणावाचा काळ असतो, कारण त्यामध्ये यशस्वी होण्याचा प्रचंड दबाव त्यांच्यावर असतो. विद्यार्थ्यांना या काळामध्ये मित्रांचा अतिरिक्त दबाव आणि आणि परीक्षेमध्ये नापास होण्याची भीती या दोन्हीला तोंड द्यावे लागते. तज्ञांच्या मते या परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थी अतिशय चिंतेत असतात आणि काहीजणांना नैराश्यदेखील येते. “हार्टफुलनेस पद्धतीने परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन’’ हे एक, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तणावाच्या दबावाला सामोरे जाण्यासाठी मदत करणारे आणि लहान वयातच ध्यानाची सवय बिंबवणारे साधन आहे.

या उपक्रमाबाबत मत प्रदर्शन करताना ‘स्कूल कनेक्ट इनिशिएटिव्ह ऑफ हार्टफुलनेसचे’ संचालक भारत माधवन म्हणाले, “समाज म्हणून आपल्यासाठी आपले युवक सामना करत असलेल्या समस्या समजून घेणे आणि जीवनातील त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना साधनसामग्री पुरवणे महत्त्वाचे आहे. परीक्षेचा काळ विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी तणावाचा असतो. या उपक्रमाद्वारे आपण विद्यार्थ्यांना या परिस्थितीला चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यासाठी भावनिक व मानसिक लवचिकतेची उभारणी करण्याचे ध्येय ठेवले आहे.“हार्टफुलनेस पद्धतीने परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन’’ याची सर्वसाधारण रचना शैक्षणिक वर्षातील या महत्त्वाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी काळजीपूर्वकपणे करण्यात आली आहे.”

या एक तासाच्या सत्रामध्ये हार्टफुलनेस ध्यान तंत्रे आणि तणावाचे व्यवस्थापन, धाडसी बनणे, लवचिक बनणे, वेळेचे व्यवस्थापन आणि आणि जीवनामध्ये शिस्त अंगी बाणवणे या विषयांवरील चर्चेचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन हे विषय हार्टफुलनेस मंडळाने विचारपूर्वक बनवलेले आहेत. या उपक्रमात सहभागी होणारे विद्यार्थी तणावामुक्त आणि एकाग्र मनाचा अनुभव घेतील, ज्यामुळे विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि शिकण्याचा हृदयकेंद्रित दृष्टिकोन तयार होईल. या सत्रांमध्ये सहभागी मुले हार्टफुल संवाद आणि लक्षपूर्वक ऐकण्याची क्षमता, विराम घेऊन प्रतिसाद देणे देखिल शिकतील. या पैलूंचा त्यांच्या दैनंदिन जीवनात अंगीकार केल्याने त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास चालना मिळावी अशा रीतीने हे विषय तयार केले आहेत. हे सत्र अनेक वेळा वापरता येईल, आणि विद्यार्थी या उपक्रमातील शिकवण आयुष्यभरासाठीची शिकवण म्हणून आत्मसात करू शकतील.

महाराष्ट्रातील हार्टफुलनेस मंडळ एम एस सी ई आर टी सी सोबत घनिष्ठपणे व कायमस्वरूपी जोडले जाण्याची आशा करीत आहे आणि शिक्षकांना व पालकांना सहाय्यभूत होईल असे कार्यक्रम तयार करण्याची योजना आखत आहे. “हार्टफुलनेस पद्धतीने परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन’’ हा उपक्रम, हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट यांच्या एच ई एल पी (हार्टफुलनेस एक्सपिरीयन्स लाईफ पोटेन्शियल) या कार्यक्रमाअंतर्गत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना HeartsApp या हार्टफुलनेसच्या मोफत ॲपद्वारे जगभरातील १४००० हार्टफुलनेस प्रशिक्षकांशी जोडले जाता यावे याचीदेखील तरतूद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button