आरोग्य

यंदा उन्‍हाळ्यात आरोग्‍याची काळजी घेण्‍याचे उपाय

- कांचन नायकवडी, प्रीव्‍हेन्टिव्‍ह हेल्‍थकेअर स्‍पेशालिस्‍ट, इंडस हेल्‍थ प्‍लस

उन्‍हाळा ऋतू सुरू झाला आहे आणि यंदा भारताच्‍या बहुतांश भागांमध्‍ये उन्‍हाळा सामान्‍यपेक्षा अधिक उष्‍ण असण्‍याची अपेक्षा आहे. सळसळते ऊन व अस्‍वस्‍थतेच्‍या भावनेव्‍यतिरिक्‍त हा ऋतू अनेक आजार देखील सोबत घेऊन येतो. काही जीवाणू व विषाणूंचा प्रसार उष्‍णतेमध्‍ये अधिक झपाट्याने होतो, ज्‍यामुळे कांजण्‍या, गोवर, टायफॉइड, कावीळ, संक्रमित हिपॅटायटीस आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिस यासारखे आजार होऊ शकतात. उन्‍हाळ्यादरम्‍यान घामावाटे आपल्‍या शरीरातून मोठ्या प्रमाणात पाण्‍याचे उत्‍सर्जन होते, ज्‍यामुळे आपल्‍याला डिहायड्रेशनचा त्रास होतो. त्‍वचेची जळजळ, त्‍वचारोग व उष्‍माघात असे इतर काही उन्‍हाळ्याशी संबंधित आजार आहेत. तसेच, मार्च महिन्‍यामध्‍ये कोविड-१९ च्‍या केसेस वाढत असताना उन्‍हाळ्यामधील या महिन्‍यांदरम्‍यान आजारी पडणे टाळण्‍यासाठी आपण स्‍वत:ची व आपल्‍या कुटुंबांची अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

खाली काही सूचना आहेत, ज्‍या तुम्‍हाला यंदाच्‍या उन्‍हाळ्यामध्‍ये आरोग्‍यदायी राहण्‍यास मदत करतील:

झोप: पुरेशी झोप न मिळाल्‍यामुळे भूक वाढणे, उच्‍च रक्‍तशर्करा, अवधान न लागणे, वारंवार आजार आणि दृष्‍टीदोष असे आजार होऊ शकतात. रात्रीच्‍या वेळी किमान ७ तास झोप घेण्‍याची काळजी घ्‍या.
हायड्रेटेड राहा: पाणी पिणे हा हायड्रेटेड राहण्‍याचा उत्तम उपाय आहे आणि त्‍यामुळे भूकेवर देखील नियंत्रण राहते. फळांचा रस किंवा ताजी काकडी, लाइम स्‍लाइसेस किंवा फळांसह त्‍यामध्‍ये स्‍वादाची भर करा. क्रिएटिव्‍ह बना.
फायबरची भर करा: भाज्‍या, फळे, नट्स व कडधान्‍यांमध्‍ये फायबर उच्‍च प्रमाणात असते. फायबरमुळे तुम्‍हाला पोट भरल्‍यासारखे वाटते, ज्‍यामुळे भरपूर प्रमाणात खाण्‍यावर नियंत्रण ठेवता येते. दिवसाला किमान २५ ग्रॅम फायबरचे सेवन करण्‍याचा प्रयत्‍न करा.
अतिरिक्‍त साखरेचे मर्यादित स्‍वरूपात सेवन: सहापेक्षा कमी चमचे अतिरिक्‍त साखरेचे सेवन करण्‍याचा प्रयत्‍न करा (यामध्‍ये फळ व दूधामध्‍ये नैसर्गिकरित्‍या आढळून येणा-या शर्करेचा समावेश नाही). हे दररोज साध्‍य करणे शक्‍य नाही, पण निदान ८० टक्‍के ध्‍येय संपादित करण्‍याचा मनसुबा ठेवा. खास मिष्‍टान्‍नासाठी सहा चमचे साखर साठवून ठेवा. नीट बारकाईने लक्ष दिले असता समजते की एक चमचा म्‍हणजे चार ग्रॅम अतिरिक्‍त साखर.
मद्यपानावर नियंत्रण ठेवा: अधिक प्रमाणात मद्यपान केल्‍याने प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. संशोधनातून निदर्शनास येते की, आपण मद्यपान करत असताना आपल्‍या आहार निवडी अयोग्‍य आहेत. मद्यपानामध्‍ये जवळपास १०० कॅलरीज असतात आणि मिश्रित पेयांमध्‍ये त्या अधिकच असतात. महिलांसाठी दिवसाला एक ड्रिंक आणि पुरूषासाठी दिवसाला दोन ड्रिंक्‍स अशाप्रकारे मद्यपानावर नियंत्रण ठेवता येते.
सक्रिय राहा: घरीच राहण्‍याच्‍या आदेशांमुळे तुमच्‍या व्‍यायामावर परिणाम झाला असेल. तरीदेखील व्‍यायामासंदर्भात ध्‍येय ठेवा आणि ते पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न करा.
वातावरणाचा आनंद घ्‍या: संशोधनातून निदर्शनास येते की लोक बाहेरील वातावरणात जातात, तेव्‍हा हृदयाची धडधड व रक्‍तदाबामध्‍ये सुधारणा होते. वेळात वेळ काढून बाहेर फेरफटका मारण्‍यास जा.
कृतज्ञता: दररोज काही वेळ काढून तुम्‍हाला आनंद किंवा उत्तम भावना दिलेल्‍या गोष्‍टींचे आभार माना. कृतज्ञ व सकारात्‍मक राहिल्‍याने जीवन आरोग्‍यदायी राहण्‍यामध्‍ये मदत होऊ शकते.
आहार, व्‍यायामासंदर्भात आरोग्‍यदायी वातावरणाची निर्मिती केल्‍याने एकूण आरोग्‍यासंदर्भात यश मिळेल. लक्षात ठेवण्याजोगी म‍हत्त्वपूर्ण बाब म्‍हणजे: शरीराची काळजी घेण्‍याची आणि आवश्‍यक आरोग्‍यदायी आहार सेवन करण्‍याची जबाबदारी तुमचीच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button