राजकारण

‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांच्या बदलीला स्थगिती

मुंबई : ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नायक यांच्या बदलीला मॅटकडून स्थगिती देण्यात आलीय. दया नायक यांची बदली करण्यात आली होती. त्यांना दहशतवादी विरोधी पथकातून थेट गोंदियात पाठवण्यात आलं होतं. पण आता दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. नायक यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचे सांगण्यात आलं होतं. नायक यांची दहशतवाद विरोधी पथकातून बदली करत, त्यांची रवानगी गोंदियाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीच्या कार्यालयात करण्यात आली होती.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांना धमक्या आल्याची चर्चा होती. त्याच्या तपासाचं कामसुद्धा दया नायक यांच्याकडेच होते. राज्यातील या बड्या नेत्यांना धमकी आल्याने त्याचा तपास एटीएसतर्फे दया नायक करत होते.या तपासासाठी त्यांना मुंबई बाहेर आणि राज्याच्या बाहेरही जावं लागलं होतं.

दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसमार्फतही करण्यात येत होता. एटीएस मार्फत या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकूण ६ टीम बनवण्यात आल्या आहेत. त्यातील जुहू एटीएसच्या टीमचे प्रभारी इन्चार्ज म्हणून दया नायक काम पाहत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button