सचिन वाझे तपास अधिकारी राहिल्यास विरोधकांचे बिंग फुटण्याची भीती
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा फडणवीसांवर संताप

मुंबई – मुकेश अंबानी (Mukesh Ambani) प्रकरणातील स्कोर्पिओ गाडी मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. मनसुख हिरेन(Mansukh Hiren) प्रकरणावरून विरोधकांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर थेट खुनाचे आरोप केले. यावरून सभागृहात गोंधळ माजला.
याबाबत शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी विरोधकांवर आक्रमक निशाणा साधला, जाधव म्हणाले की, २०१८ मध्ये अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे प्रकरण दाबून टाकले, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अन्वय नाईक (Anavay Naik Suicide Case) यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सासू आणि नवऱ्याच्या मृत्यूची चौकशी करावी असं पत्र दिलं, देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण दाबलं असंही म्हटलं, या प्रकरणाची चौकशी सचिन वाझे करत आहेत, म्हणून त्यांच्यावर आरोप करून त्यांना काढून टाकण्याची मागणी केली जातेय, पण सरकार सचिन वाझेंना काढणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला.
इतकचं नाही तर आमचं केंद्रात सरकार आहे, त्यामुळे विरोधकांना असं वाटतंय आमचं कोणी काही करू शकत नाही. राज्यानं ज्यांचे संरक्षण काढलं अशा गुंडांना केंद्राने संरक्षण दिलं. जस्टिस लोया यांची नागपूरात हत्या कशी झाली? हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावे. सचिन वाझे(Sachin Vaze) तपास अधिकारी राहिला तर विरोधकांचे बिंग फुटेल याची भीती देवेंद्र फडणवीसांना आहे असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला यावर देवेंद्र फडणवीसांनीही चोख उत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सभागृहात इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर गदारोळ होत असताना मुख्यमंत्री कुठे आहेत…? पोलीस लोकांची हत्या करतायेत. सचिन वाझे यांना कोणाच्या दबावाखाली वाचवण्याचं काम सुरू आहे. अन्वय नाईक प्रकरणात हायकोर्टाने काय म्हटलंय हे भास्कर जाधव यांना माहिती नाही. गृहमंत्र्यांना खुलं आव्हान आहे, कर नाही त्याला डर कशाला….माझी चौकशी करावी….धमक्या देऊन सचिन वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करतायेत का? असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला विचारला.
भास्कर जाधव यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर देत म्हटले आहे की, २०१८ मध्ये अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण दाबून टाकले. त्यामुळे ठाकरे सरकार आल्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. या पत्रात देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण दाबले असल्याचेही म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सचिन वाझे करत आहेत. म्हणून त्यांच्यावर आरोप करुन त्यांना तपासातून काढण्याची मागणी विरोधक करत आहेत.
सरकार सचिन वाझेंना काढणार नाही असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. तसेच केंद्रात सत्ता असल्यामुळे भाजपला असे वाटत आहे की, आमचे कोणी काही करु शकत नाही असे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. तसेच सचिन वाझे जर तपास अधिकारी तर विरोधकांचे बिंग फुटेल अशी भीती देवेंद्र फडणवीसांना आहे असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला आहे. अर्णब गोस्वामी यांचा लाडका पुत्र आहे. अर्णब गोस्वामीला अटक केल्यामुळे भाजपचा जळफळाट झाला असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.