फोकस

सुवर्ण मंदिरात दरबार साहेबमध्ये उडी घेणाऱ्याला भाविकांची मारहाण; जखमी तरुणाचा मृत्यू

चंदिगढ: अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुद्वाऱ्यात गेलेल्या एका तरुणानं पवित्र ग्रंथाचा अनादर करण्याचा प्रयत्न केला. पवित्र गुरु ग्रंथ साहेबच्या समोर ठेवण्यात आलेली तलवार धरण्याचा प्रयत्न तरुणानं केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही भाविकांनी त्याला मारहाण केली. त्यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे गुरुद्वाऱ्यात काही वेळ तणावपूर्ण वातावरण होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहरास साहेब पाठ सुरू असताना एका अज्ञात व्यक्तीनं रेलिंगवरून उडी मारली. त्यानं गुरु ग्रंथ साहेबसमोर ठेवलेली तलवार पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गर्दीतील काहींनी त्याला धरलं आणि मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

श्री अमृतसर साहेबमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून पंजाब सरकारनं या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी एसजीपीसीचे कार्यकारी सदस्य गुरुप्रीत सिंह रंधावा यांनी सोशल मीडियावर केली. मृत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. संबंधित तरुण त्यावेळी एकटाच आला होता. त्याच्यासोबत कोणीही नव्हतं. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती डीसीपी परमिंदर सिंग यांनी दिली. तरुण अचानक ग्रीलवरून उडी मारून गुरु ग्रंथ साहेबजवळ पोहोचला. त्या ठिकाणी बसण्याची परवानगी केवळ ग्रंथींना असते. गुरु ग्रंथ साहेब ठेवण्यात आलेली जागा अतिशय पवित्र मानली जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button