महिंद्रा ट्रिओ झॉर इलेक्ट्रिक वाहन विक्रीचा १००० चा टप्पा पार
बेंगळुरू : महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एम अँड एम) या 19.4 अब्ज डॉलर्सच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने आज लोकप्रिय महिंद्रा ट्रिओ झॉर इलेक्ट्रिक तीन चाकी गाडीने (कार्गो) 1000 युनिट्स विक्रीचा टप्पा गाठला आहे. लाँच झाल्यापासून केवळ सहा महिन्यांत महिंद्रा ट्रिओ झॉर भारतातील पहिल्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार्गो बनली असून तिने या क्षेत्रातील बाजारपेठेचा 59 टक्के हिस्सा संपादन केला आहे.
ऑक्टोबर 2020 मधे लाँच झालेल्या महिंद्रा ट्रिओ झॉरने आपली सर्वोत्तम वैशिष्ट्ये आणि ग्राहकाला अधिक बचत करून देण्याच्या आपल्या अनोख्या वैशिष्ट्यांच्या जोरावर तीन चाकी वाहनांच्या बाजारपेठेत क्रांती घडवून आणली. महिंद्रा ट्रिओ झॉर हे लास्ट माइल डिलीव्हरी (शेवटच्या टोकापर्यंत वितरण करणारे) इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) असून ट्रिओ या प्रस्थापित तीन चाकी प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहे. संपूर्ण ट्रिओ प्लॅटफॉर्मची रचना आणि विकास भारतात करण्यात आला असून ट्रिओ झॉर हे कंपनीच्या इलेक्ट्रिक तीन चाकी वाहन श्रेणीतील सर्वात नवे उत्पादन आहे.
महत्त्वाची वैशिष्ट्ये
उच्च प्रतीची इंधन बचत क्षमता – असामान्य बचत, प्रती वर्ष 60,000* रुपयांपेक्षा जास्त
ताकदवान कामगिरी – कोणत्याही इतर डिझेल 3डब्ल्यूच्या तुलनेत 8केडब्ल्यूची उच्च ताकद आणि 42 एनएम टॉर्क. विभागातील सर्वाधिक 550 किलो पेलोड**
आरामदायी प्रवास – क्लचशिवाय असलेल्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे गोंगट आणि व्हायब्रेशनमुक्त प्रवास
स्थिर आणि सुरक्षित – या क्षेत्रातील सर्वात लांब म्हणजेच 2216 एमएमचा व्हीलबेस आणि सर्वात मोठे म्हणजेच 30.48 सेमीचे टायर्स
आधुनिक लिथियम- इयॉन बॅटरी तंत्रज्ञान – सफाईदार प्रवास, शून्य देखभाल करावी लागणारी आणि 1.5 लाख किलोमीटर्सपेक्षा जास्त चालणारी बॅटरी, 3 वर्ष किंवा 80,000 किलोमीटर्सची नेहमीची वॉरंटी, अतिरिक्त 2 वर्ष किंवा 1 लाख किलोमीटर्ससाठी लागू होणाऱ्या वॉरंटीसह
यानिमित्ताने ग्राहकांचे आभार मानत महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, ‘ट्रिओ झॉरने महिंद्रासाठी नवी समीकरणे प्रस्थापित केली आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे भारताचा कल ई- मोबिलिटीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलेल्या ग्राहकांसाठी यामुळे समीकरणे बदलण्यास मोठी मदत झाली. ट्रिओ झॉर ग्राहकांना लास्ट माइल इलेक्ट्रिक कार्गो वाहनाकडून असलेल्या अधिक बचतीच्या अपेक्षा सक्षमपणे पूर्ण करते. आघाडीच्या ई- कॉमर्स कंपन्यांसाठी आणि त्यांच्या फ्लीट ऑपरेटर्ससाठी हे वाहन सर्वाधिक पसंतीचे वितरण वाहन ठरल्याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो. ट्रिओ झॉरची निवड करणाऱ्या आणि या क्षेत्रात आम्हाला आघाडीचे स्थान मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व ग्राहकांचे आम्ही आभार मानतो.’
नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या अपोलो सीव्ही पुरस्कारांच्या 12 व्या आवृत्तीमधे महिंद्रा ट्रिओ झॉरला ‘बेस्ट एससीव्ही ऑफ द इयर’ हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ट्रिओ झॉरने नाविन्यता, बाजारपेठेतील आवश्यकता, किंमत आणि मालकीची एकूण किंमत अशा विविध निकषांवर आपल्या कामगिरीने परीक्षकांना प्रभावित केले. महिंद्राची सर्वात नवीन ईव्ही कंपनीसाठी आकर्षकरीत्या यशस्वी ठरली असून भारतातील ईव्ही वापरास चालना देत आहे.
या व्यतिरिक्त महिंद्रा ट्रिओच्या इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांच्या श्रेणीने 8000 युनिट्स विक्रीचा टप्पा पार केला असून ती देशभरात 400 जिल्ह्यांत विकली जात आहे. एकत्रितपणे ट्रिओ श्रेणीने भारतीय रस्त्यांवर 40 दशलक्ष किलोमीटर्सचे अंतर पार केले असून टेलपाइद्वारे होणारे 2200 मेट्रिक टन्सचे कार्बन उत्सर्जन वाचवले आहे. हे इतक्या प्रमाणातील उत्सर्जन शोषून घेण्यासाठी आवश्यक असलेली 1 लाख झाडे लावण्यासमान आहे.