महिंद्रा फार्म इक्विपमेंट सेक्टरद्वारे मार्च २०२१ मधे भारतात २९,८१७ युनिट्सची विक्री

मुंबई : महिंद्र अँड महिंद्रा लि. च्या फार्म इक्विपमेंट सेक्टर (एफईएस) या 19.4 अब्ज डॉलर्सच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने आज मार्च 2021 मधील विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत.
मार्च 2021 मधील देशांतर्गत विक्री 29,817 युनिट्सवर गेली असून मार्च 2020 मधे ही संख्या 13,418 युनिट्स होती. मार्च 2021 मधील एकूण ट्रॅक्टर विक्री (देशांतर्गत + निर्यात) 30,970 युनिट्सपर्यंत पोहोचली असून गेल्या वर्षी याच कालावधीमधे ही आकडेवारी 13,613 युनिट्स होती. या महिन्यातील निर्यात 1153 युनिट्सवर गेली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीविषयी महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले, ‘मार्च 2021 मधे आम्ही देशांतर्गत बाजारपेठेत 29,817 ट्रॅक्टर्सची विक्री केली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. लोअर बेस इम्पॅक्ट आणि सातत्यपूर्ण सकारात्मक वातावरणाला समतोल साठा पातळी, उच्च एमएसपी आणि वाढीव लिक्विडीची जोड मिळाल्यामुळे मार्च महिन्यात चांगली घाऊक विक्री झाली. रबीचा हंगाम चांगल्या प्रकारे जात असल्यामुळे तसेच काही निवडक बाजारपेठांमधे उन्हाळी पिकांची लागवड सुरू असल्यामुळे ट्रॅक्टरला असलेली मागणी टिकून राहील असा आमचा अंदाज आहे. निर्यात बाजारपेठांमधे आम्ही 1153 ट्रॅक्ट्रर्सची विक्री केली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात 491 टक्के वाढ झाली आहे.’
फार्म इक्विपमेंट सेक्टर (एफडी+एसडी+ग्रोमॅक्स) | ||||||
मार्च | एकत्रित मार्च | |||||
आर्थिक वर्ष 20 | F21 | टक्केवारी बदल | आर्थिक वर्ष 20 | आर्थिक वर्ष 21 | टक्केवारी बदल | |
देशांतर्गत | 13418 | 29817 | 122% | 291901 | 343833 | 18% |
निर्यात | 195 | 1153 | 491% | 10014 | 10665 | 7% |
एकूण | 13613 | 30970 | 128% | 301915 | 354498 | 17.4% |
*निर्यातीमधे सीकेडीचा समावेश