राजकारण

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; भाजपची आज महाराष्ट्रात निदर्शने

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी हॅटट्रिक साधलीय. भाजपच्या तगड्या आव्हानाचा सामना करताना ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली आहे. मात्र, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर तिथे मोठा हिंसाचार भडकला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचं सत्र सुरु झालं आहे. या हिंसाचारातील बळींचा आकडा ११ वर पोहोचलाय. हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसप्रणित असल्याचा आरोप करत भाजपकडून आज (बुधवार) महाराष्ट्रात निदर्शनं करण्यात येणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही त्याबाबत माहिती दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उद्या, बुधवारी राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करणार आहेत, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button