इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसच्या मोर्चातील नेते घोषणा देताना बैलगाडीवरून कोसळले
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. पश्चिम बंगालसह ५ राज्यांमध्ये एप्रिलमध्ये निवडणुका असताना पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. मात्र त्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरांनी पेट घेतला आहे. त्यामुळे अन्नधान्य आणि इतर वस्तूदेखील महागल्या आहेत. वाढत्या इंधन दरांविरोधात काँग्रेसनं मुंबईत मोर्चा काढला. या मोर्चाला काँग्रेस नेते बैलगाडीतून आले. मात्र बैलगाडीवरील वजन वाढल्यानं ती कोसळली आणि काँग्रेस नेते जमिनीवर पडले.
इंधन दरवाढीविरोधात आज मुंबई काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं. मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि अन्य नेते बैलगाडीवरून आंदोलनात सहभागी झाले होते. बैलगाडीवर जास्त नेते झाल्यानं ती कोसळली आणि भाई जगताप यांच्यासह सगळे नेते खाली कोसळले.
गेल्या काही महिन्यांपासून घरगुती वापराच्या सिलिंडरचे दरदेखील वाढले आहेत. त्यामुळे बैलगाडीवरील एक कार्यकर्ता हातात सिलिंडर घेऊन घोषणाबाजी करत होता. तितक्यात बैलगाडी कोसळली. त्यामुळे कार्यकर्ता सिलिंडर घेऊन जमिनीवर पडला. सुदैवानं कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तोल सांभाळा! …अन्यथा राज्याच्या राजकारणातही काँग्रेस कोसळेल; भाजपचा टोला
‘तोल सांभाळा! नाहीतर महाराष्ट्रातही काँग्रेस अशीच कोसळेल’, ‘त्या’ घटनेवरून भाजपचा सल्ला@BhaiJagtap1 @keshavupadhye @INCMaharashtra @bb_thorat @NANA_PATOLE @BJP4Maharashtra
https://t.co/R5esgiQgeM— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) July 10, 2021
मुंबईमध्ये काँग्रेस इंधनरदवाढीविरोधात आंदोलन करत बैलगाडी आंदोलन करत निषेध नोंदवला. यावेळी अपघात होऊन बैलगाडीवरील काँग्रेस नेते खाली कोसळले. यावरून आता भाजपने खोचक टोला लगावला असून, तोळ सांभाळा, असे म्हटले आहे. तोल सांभाळा भाई जगताप. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे.