मनोरंजनसाहित्य-कला

प्रसिद्ध गायक बादशाह आणि पायल देव यांच्या ‘से येस टू द ड्रेस इंडिया’ सर्वोत्तम विवाह गीताचा शुभारंभ

आपले डान्सिंग शूज घाला आणि बादशहाच्या विवाह गीताच्या आस्वादासाठी सज्ज व्हा!

मुंबई : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फ्रँचायझी से येस टू द ड्रेस ची भारतीय आवृत्ती भारतात आणून डिस्कव्हरी+ आपल्या श्रोत्यांना आनंदाचा धक्का देण्यास सज्ज झाले आहे! विवाहाच्या काळामध्ये ह्या ब्रँडने भारतातील सर्वांत प्रसिद्ध रॅपर्स आणि युवा सेन्सेशन बादशाहला ह्या म्युझिक व्हिडिओसाठी घेतले आहे. आघाडीची महिला गायिका म्हणून त्याच्यासोबत मेलोडीयस आवाजाची पायल देव आहे. ह्या श्रवणीय ट्रॅकला आदित्य देवने कंपोझ केले आहे व व्हिडिओची निर्मिती द कंटेंट टीम ह्या प्रॉडक्शन हाऊसने केली आहे. ह्या गाण्याच्या व्हायरलिटी क्षमतेला आणखी उंचावण्यासाठी डिस्कव्हरी+ ने प्रत्येकाचा आवडता डान्सर व अतिशय प्रसिद्ध अशा पुनित जे पाठकला कोरिओग्राफसाठी सहभागी केले आहे.

त्याच्याशिवाय अजूनही आहे! पहिल्यांदाच श्रोत्यांना प्रसिद्ध कंपोझर बादशाहला पाच आधी कधीही न बघितलेल्या अवतारांमध्ये बघता येईल. इव्हेंट मॅनेजर, पंडीत, शेफ, रॅपर आणि फॅशन डिझायनर बनून तो अतिशय ऊर्जेने परफॉर्म करेल. ह्या व्हिडिओमध्ये रिअल टाईम नववधूंचे दर्शन तर घडेलच, पण त्यासह शोमधील मनोरंजन, सेलिब्रेशन आणि प्रत्येक वधूकडे तिला हवे असलेले लक्ष देण्याची थीमसुद्धा असेल. हा शो थक्क करणारा असेल आणि रॅपरचे सर्वांत नवीन लग्नाचे गीत तर आपल्याला स्वे करेल व ते आपल्या प्लेलिस्टमध्ये पहिल्या जागी पोहचेल!

डिस्कव्हरी+ साठीच्या त्याच्या से येस टू द ड्रेस इंडिया ह्या नवीन ट्रॅकबद्दल बोलताना बादशहा म्हणाला, “हे गीत प्रत्येक वधूसाठी योग्य नोटसला हिट करते व वधूच्या मनात येणा-या अनेक विचारांना कॅपचर करण्याचा मी प्रयत्न करत असताना त्याचे प्लेआउट आखणे अतिशय मजेशीर होते. पहिल्यांदाच मी केवळ माझ्या भुमिकेत नव्हतो तर काही अतिशय वेगळ्या ‘अवातारांमध्येही’ होतो व त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठीसुद्धा अतिशय वेगळा ठरला.” त्याने पुढे म्हंटले, “ह्या वर्षी दुस-यांदा डिस्कव्हरी+ सोबत सहभागी होणे अतिशय आनंदाची बाब आहे आणि भविष्यातही त्यांच्यासोबत अशा मनोरंजक प्रकल्पांवर काम करण्याची मला इच्छा आहे. मला आशा आहे की, ह्या गाण्यामुळे उंच दर्जा गाठला जाईल व से येस टू द ड्रेस प्रमाणे ते प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये नक्कीच पोहचेल.”

बादशहासोब्त काम करणे नेहमीच आनंददायक असते आणि हे गाणे तर कानाला जादुसारखे भसते. आम्ही स्वत: ह्या ट्रॅकचा इतका आनंद घेतो, त्यावरून मी खात्रीने म्हणू शकते की हे गाणे जितके डिजर्व्ह करते, तितके प्रेम त्याला नक्कीच श्रोत्यांकडून मिळेल. “, गायिका पायल देवने म्हंटले.

“हे गाणे ऐकताना मला लक्षात आले की, हे सीजनचे मुख्य गाणे ठरणार आहे व म्हणून मी त्याची कोरिओग्राफी शक्य तितकी सोपी व कॅची ठेवली जेणेकरून भारतीय विवाहामध्ये किंवा पार्टीच्या प्रसंगी प्रत्येक जण ते सहजपणे रिक्रिएट करू शकेल. तसेच, बादशाहने हे इतके थक्क करणारे आश्चर्यकारक गीत बनवले आहे की, त्याला बघतानाही न्याय देण्यासाठी मला त्याच्या चाहत्यांसाठी सरप्राईझ एलिमेंट म्हणून त्यालाही त्यामध्ये आधी कधीही न बघितलेल्या पंडीत, विवाहाचा आयोजक, शेफ व डिझाईनर अशा रूपामध्ये दाखवावेसे वाटले व ते त्यानेही‌ उत्तम प्रकारे पार पाडले,” असे कोरिओग्राफर पुनीत जे पाठक ह्यांनी म्हंटले.

कंटेंट टीमचे संस्थापक व मुख्य निर्माते नीरज शर्मा ह्यांनी म्हंटले, “टीसीटीमध्ये आमचा विश्वास आहे की, क्रिएटीव्ह सोल्युशन्सद्वारे श्रोत्यांना कंटेंटच्या जवळ आणणे गरजेचे आहे. भारतातील काही प्रतिष्ठित गाण्याच्या रिअलिटी शोजला अलीकडच्या काळात मिळालेल्या सफलतेमुळे आम्हांला म्युझिक इंडस्ट्रीमध्ये श्रोत्यांना काय हवे आहे, ह्याची नीट कल्पना आली. वर्षाचा सर्वांत मोठा शादी ब्लॉकबस्टर आपल्यासाठी घेऊन येताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे.”

८ डिसेंबर २०२१ रोजी प्रिमियर होत असलेल्या से येस टू द ड्रेस इंडियामध्ये वेगवेगळ्या जीवन क्षेत्रांमधील वधूंचे दर्शन घडेल व देशातील आघाडीचे फॅशन डिझायनर्स त्यांना त्यांच्या स्वप्नातील वस्त्रांच्या निवडीसाठी व तयारीसाठी मदत करतील. लवकरच आपल्या देशात सुरू होत असलेल्या आपल्या आवडत्या से येस टू द ड्रेस इंडिया शोबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी व कौटुंबिक रोमांच, मनोरंजन, नृत्य आणि रंगांचा सोहळा ह्याने ओतप्रोत असलेल्या त्यांच्या खास भारतीय विवाहामधील त्यांच्या ‘परफेक्ट’ पोशाखासाठी ह्या वधुंना तयार करण्यामध्ये असलेले सर्व नाट्य व आनंदाचा आस्वाद घ्या ही जागा बघत राहा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button