अर्थ-उद्योगतंत्रज्ञान

ट्रूकद्वारे एअर बड्स आणि एअर बड्स प्लस लॉन्च

मुंबई : ट्रूक या उच्च दर्जाचे वायरलेस हेडफोन्स, इयरफोन्स आणि साऊंड व्यावसायिक तसेच संगीततज्ञांसाठी एक उत्तम उपकरण देणाऱ्या भारतातील आघाडीच्या ऑडिओ ब्रँडने आपल्या टीडब्ल्यूएस मालिकेतील एअरबड्स आणि एअरबड्स प्लस आणले असून त्याद्वारे स्मार्ट अ‍ॅप्लिकेशनद्वारे २० प्रीसेट ईक्यू मोड्स, नॉइस कॅन्सलेशन आणि एक नियत गेमिंग मोड पाहता येईल. ट्रूक एअर बड्सची किंमत १५९९ रूपये असून ते सोमवारपासून फक्त फ्लिपकार्टवर तसेच एअर बड्स प्लस हे फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर १६९९ रूपयांत उपलब्ध होतील.

या दोन्ही टीडब्ल्यूएसमध्ये विविध प्रकारची सर्वोत्कृष्ट वैशिष्टे आहेत, २० पूर्वनिश्चित ईक्यू मोड्स, स्मार्ट अ‍ॅप्लिकेशनद्वारे कस्टमाइज करण्यायोग्य ईक्यू आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना आपल्या आवडीनुसार संगीत किंवा आवाजाची वारंवाता बदलणे आणि समृद्ध तसेच अधिक चांगला अनुभव मिळवणे शक्य होईल. ३०० एमएएच चार्जिंग केसमध्ये ४० एमएएच इयरबर्डसची बॅटरी क्षमता आणि त्यासोबत सिंगल चार्ज प्लेबॅकसोबत आहे, जो १० तास टिकतो आणि केससोबत एकूण प्लेटाइम ४८ तासांचा असून टाइप सी चार्जिंग पोर्ट आहे. वाढीव कॉल दर्जा सुधारणेसाठी या एअरबड्सना क्वाड एमईएमएस माइक (प्रत्येक एअरबडवर ड्युएल माइक) आहेत, ज्यांना एआय ऊर्जाप्राप्त नॉइस कॅन्सलेशन सिस्टिमने ऊर्जा मिळाली आहे. त्यात एक ऑटो इन इयर उच्च अचूकता आहे. त्यामुळे घातल्यावर रियल टाइम डिटेक्शन करणे शक्य होते आणि तुम्ही इयरबड घातल्यावर किंवा काढल्यावर संगीत आपोआप सुरू होते किंवा बंद होते.

वाढीव बॅटरी आयुष्य, सुधारित कनेक्टिव्हिटी आणि उत्तम फिट यांच्याखेरीज त्यात एक नियत गेमिंग मोड फीचर आहे. त्यात ५५ एमएसपर्यंत अत्यंत कमी लॅटन्सी आहे. त्यामुळे सर्वोत्तम गेमिंग अनुभव मिळू शकतो. सुरक्षित फिट आणि हलकेफुलके इयरफोन्स दिवसभराच्या आरामासाठी उत्तमरित्या तयार केलेले आहेत आणि सर्वोत्तम फिटिंगसाठी ते ४५ अंशांपर्यंत उत्तमरित्या वळवले गेले आहेत.

ट्रूक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज उपाध्याय म्हणाले की, या उत्पादनांची रचना एका उत्तम श्रवण अनुभवासाठी केली गेली आहे. आम्ही भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या साऊंडवेअर ब्रँड म्हणून आमचे स्थान कायम राखले आहे आणि क्यू२ २०२१ सीवायमध्ये टीडब्ल्यूएस वर्गवारीत आमचा बाजारातील वाटा सुमारे ५ टक्के आहे. या उत्पादनासोबत आम्ही निश्चित गेमिंग मोडद्वारे आणि परवडणाऱ्या किंमतीत ५५ एमएसपर्यंत इतक्या अत्यंत कमी लॅटन्सीसोबत सर्वोत्तम गेमिंग अनुभव देण्याचे लक्ष्य ठेवत आहोत. आमचे प्रत्येक उत्पादन हे नावीन्यपूर्णता आणि अधिक चांगल्या तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, आमचे वापरकर्ते हे उत्तम श्रवणानुभवासाठी सज्ज असतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button