अर्थ-उद्योग

एमअँडएम लिमिटेडचे डॉ. अनिश शाह नवे व्यवस्थापकीय संचालक, सीईओ

मुंबई : लॉजिस्टिक्स व व्यक्ती वाहतूक सेवा पुरवणारी आघाडीची कंपनी महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडने (एमएलएल) २ एप्रिल २०२१ पासून आपल्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ अनिश शाह यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली आहे. याच दिवशी डॉ शाह यांचा कंपनीच्या संचालक मंडळात समावेश होईल. ते महिंद्रा अँड महिंद्रा (एमअँडएम) लिमिटेडचे उप व्यवस्थापकीय संचालक व ग्रुप सीएफओ आहेत. २ एप्रिल २०२१ पासून एमअँडएम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून ते पदभार स्वीकारतील.

महिंद्रा ग्रुपच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व मोबिलिटी सर्व्हिसेस सेक्टरचे अध्यक्ष व्हीएस पार्थसारथी यांनी आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी जोपासण्यासाठी महिंद्रा ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या करिअरच्या पुढील टप्प्यात उद्योगक्षेत्र, शिक्षणक्षेत्र आणि समाजातील विविध व्यवसाय व उपक्रमांना उभारणी व वृद्धीसाठी सल्ला, मार्गदर्शन पुरवण्याची त्यांची इच्छा आहे. पार्थसारथी हे २ एप्रिल २०२१ पासून महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (एमएलएल) मंडळाचा राजीनामा देतील.

डॉ. शाह २ एप्रिल २०२१ पासून एमएलएल बोर्डाचे अध्यक्ष असतील. महिंद्रा ग्रुपसाठी पुढील वाटचालीच्या दृष्टीने लक्षणीय असलेल्या लॉजिस्टिक्स आणि मोबिलिटी सेवांचे महत्त्व ध्यानात घेता ही नेमणूक देखील महत्त्वाची आहे. या घडामोडींबद्दल बोर्डाच्या नॉमिनेशन अँड रिम्यूनरेशन कमिटीचे अध्यक्ष दारियस पांडोले यांनी सांगितले, मंडळाचे अध्यक्ष म्हणून पार्थसारथी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. नवे अध्यक्ष म्हणून आम्ही डॉ अनिश शाह यांचे स्वागत करतो. रामप्रवीण स्वामिनाथन आणि त्यांच्या व्यवस्थापन टीमच्या नेतृत्वाखाली आपले वृद्धी धोरण असेच पुढे सुरु ठेवण्यासाठी एमएलएल सज्ज आहे. आम्हाला पक्की खात्री आहे की, मंडळाचे अध्यक्ष या नात्याने डॉ अनिश यांचे नेतृत्व कंपनीच्या प्रगतीला अधिक जास्त वेग देईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button