अर्थ-उद्योग

‘सिंफनी’ची नवीन मोहीम ‘मन थंडा तन ताजा रहे’!

मुंबई : जगातील सर्वात मोठे एअर कूलर उत्पादक सिंफनी लि. यांनी ‘मन थंडा तन ताजा रहे ’ ही हार्ट-वार्मिंग मोहीम सुरू केली आहे. ताजी आणि थंड हवा लोकांच्या जीवनात नवीन दृष्टीकोन आणू शकते यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या फिल्मद्वारे ब्रँड ने या मोहिमेची सुरुवात केली आहे. एप्रिलच्या उष्णतेच्या प्रारंभासह, भारतीय प्रेक्षकांच्या भेटीची ही योग्य वेळ आहे. ही मोहीम मराठी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, उडिया, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये डब केली आहे. 360-डिग्री मोहिमेची जाहिरात टेलीव्हिजन, डिजिटल, रेडिओ, ओओएच आणि इतर माध्यमांमध्ये प्रसारित केली जाईल.

तापमान वाढीसह लवकर उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने यावर्षी एअर कूलर ही काळाची गरज आहे. सिंफनीकडे घरगुती ते व्यावसायिक, औद्योगिक कूलरपर्यंत विस्तृत कूलर रेंज उपलब्ध आहे. या मोहिमेबद्दल बोलताना, श्री. राजेश मिश्रा, अध्यक्ष – सेल्स आणि मार्केटिंग, सिंफनी म्हणतात, “सिम्फनी ही जगातील आघाडीची एअर कूलर कंपनी आहे. आम्ही नेहमी मोठ्या आणि चांगल्या योजनांसह पुढे येत असतो आणि प्रेम वाचवण्याच्या कथेपेक्षा अधिक चांगले काय असू शकते? ‘मन थंडा तन ताजा रहे’ काळ कितीही कठीण असला तरीही शांत आणि ताजेतवाने राहणे किती आवश्यक आहे यावर प्रकाश टाकून आपल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये ओढ कायम ठेवण्याचे आमचे लक्ष्य आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button