कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली : 67व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांची (67th National Film Awards) घोषणा सोमवारी करण्यात आली आहे. अभिनेत्री कंगणा रणौतला तिच्या वाढदिवशी मोठं गिफ्ट मिळालं आहे. कंगणाला (Kangana Ranaut) ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या सिनेमांसाठी सर्वोतकृष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात ‘67वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळा जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात अभिनेत्री कंगना रनौत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. पंगा आणि मणिकर्णिका या चित्रपटात तिनं केलेल्या जबरदस्त अभिनयासाठी तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दरम्यान कंगनाचे चाहते सध्या प्रचंड खुश आहेत. सोशल मीडियाद्वारे त्यांनी कंगनावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आपल्या बिनधास्त आणि अनोख्या शैलीमुळे रसिकांबरोबरच समीक्षकांच्याही मनात स्थान मिळविलेल्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये कंगना मोडते. तिला पदार्पणातच ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘गँगस्टर’पासून सुरू झालेला तिच्या या प्रवासात तिने, ‘वो लम्हें’, ‘फॅशन’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘तनू वेड्स मनू’ आदी चित्रपटांत आपला प्रभाव दाखवला. तीन राष्ट्रीय पुरस्कार, चार फिल्मफेअर आणि पद्मश्री अशी तिची समृद्ध मिळकत आहे.
बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत तिच्या अभिनय कौशल्याबरोबरच तिच्या बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखली जाते. ती कधीही कोणत्याही विषयावर उघडपणे बोलण्यात कचरत नाही. तसेच, ती बर्याचदा थेट हल्लाबोल करतानाही दिसते. तिच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर इंडस्ट्रीचा पाठिंबा न मिळाल्याने कंगना नाराज झाली होती. अशा परिस्थितीत तिने जाहीरपणे आपला संताप माध्यमांसमोर व्यक्त केला होता. यावेळी तिने ‘राष्ट्रीय पुरस्कारां’बद्दल ही वक्तव्य केले होते.
चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकलेल्या कंगना रनौतने या संदर्भात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, ‘मणिकर्णिका’ राष्ट्रीय पुरस्कार मिळणे अपेक्षित आहे. पण त्याच वेळी ती म्हणाले होती की, ‘मणिकर्णिका’ ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही, तर राष्ट्रीय पुरस्काराच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जाईल, असेही तिने म्हटले होते. मात्र, याच चित्रपटासाठी तिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार मिळाला आहे.