
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावरील आजच्या सुनावणीला स्थगिती देण्यात आली आहे. उद्या म्हणजेच २७ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा या जामीन अर्जावर युक्तिवाद होईल. आज दिवसभरात फक्त आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. उद्या दुसऱ्या बाजूने युक्तिवाद होणार आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली आहे. क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असेलल्या आर्यन खानने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्च केलेला आहे. या अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी आर्यन खानची बाजू ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी मांडली. आर्यन खानच्या वतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे, या प्रतिज्ञापत्रामध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी त्याच्या बाजूने कोणताही व्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे. हा सर्व राजकीय लोक आणि एनसीबीमधील मामला आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणीसाठी हायकोर्टात भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि जेष्ठ कायदेतज्ञ मुकूल रोहतगी कोर्टात पोहचले आणि रोहतगी आर्यनच्या जामिनासाठी जोरदार युक्तिवाद केला. नंतर अरबाज मर्चंटची बाजू मांडण्यासाठी वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. त्यावेळी कोर्टाने तुम्हाला किती वेळ लागेल, अशी विचारणा केली. त्यावर अमित देसाई यांनी ४५ मिनिटं लागतील तर एनसीबीच्या वतीने एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी देखील ४५ मिनिटं लागतील असं सांगितले. त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली. उद्या दुपारी यावर सुनावणी घेण्यात येईल.
मुकुल रोहतगींनी आर्यनच्या जामिनासाठी जवळपास ५०-५५ मिनिटं युक्तिवाद केला. त्यानंतर मुकुल रोहतगी यांनी केसशी संबंधित हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या काही महत्त्वपूर्ण संदर्भ देणाऱ्या निकालांचं वाचन केले.
ज्यांना ड्रग्ज तस्करीच्या आरोपांत पकडलं जात नाही, त्यांना अट्टल गुन्हेगारांप्रमाणे वागवणं चुकीचं आहे. एनडीपीएस कायद्यातही स्पष्ट केलंय की, ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांना सुधारण्याची संधी द्यायला हवी. त्यांना जेलऐवजी पुनर्वसन केंद्रात पाठवलं जातं असा युक्तिवाद रोहतगी यांनी हायकोर्टात केला. जर कमी प्रमाणात अमली पदार्थ सापडले असतील तर त्या आरोपीला जेलमध्ये टाकलं जात नाही. त्याला सुधारण्याची संधी दिली जाते. तर इथे आर्यनकडे काहीच सापडलेलं नाही आणि तरीही आर्यन २० दिवसांपासून तुरूंगात आहे असं रोहतगी यांनी हायकोर्टात म्हटलं. आर्यन खान आणि अचित यांच्यात फक्त पोकर गेमबद्दल चर्चा, असा रोहतगी यांनी दावा केला.
आर्यनला गोवण्यासाठी एनसीबीनं साल २०१८ पासूनच्या व्हॉट्सअॅपचा संदर्भ जोडला आहे. या चॅटमधून काहीही सिद्ध होत नाही एनसीबीसाठी तो महत्त्वाचा पुरावा असेल मात्र त्याचा या घटनेशी कुठेही संबंध लागत नाही. आपण तिथं जाऊ, हे खाऊ, ते पिऊ या गोष्टी पुरावा कसा मानता येतील? असं रोहतगी यांनी युक्तीवादात म्हटलं आहे. एनडीपीएस कायद्यात अमली पदार्थ्यांच्या मात्रेलाही महत्व आहे. आर्यनकडे तर काहीच सापडलेलं नाही. मग त्याच्यावर या कटात सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कायद्यानं आरोपीकडे अमली पदार्थ सापडणं गरजेचं असतं, दुस-याकडे काय सापडलं त्याचा माझ्याशी काय संबंध? असा युक्तिवाद आर्यनच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी केला. एका पंचाचा कर्मचारी असलेल्या दुसऱ्या पंचाने इथल्या एनसीबी प्रमुखांवर गंभीर केले आहेत. हे सर्व प्रकरण एका राजकिय नेत्याच्या जावयाशी संबंधित आहे. मात्र आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, आमची केस गुणवत्तेच्याच आधारावर जामीनास पात्र असल्याचं रोहतगी हायकोर्टात म्हणाले.
पुढे रोहतगी म्हणाले, आता यापूर्वीचे काही संदर्भ जोडून आर्यन अमली पदार्थांचं सेवन करतो हे दाखवण्याचा तपास यंत्रणेचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यामुळे या घटनेतील आर्यन आणि अमली पदार्थांचा संदर्भ कसा जोडता येईल? असा सवाल रोहतगी यांनी उपस्थित केला. आर्यननचा या हस्तगत केलेल्या अमली पदार्थांशी काहीही संबंध नसून त्याचा याच्या खरेदीतही कुठे संबंध असल्याचे पुरावे नाहीत. त्यानं यासाठी कुणालाही पैसे दिलेले नाहीत.
पुढे रोहतगी म्हणाले, आता यापूर्वीचे काही संदर्भ जोडून आर्यन अमली पदार्थांचं सेवन करतो हे दाखवण्याचा तपास यंत्रणेचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यामुळे या घटनेतील आर्यन आणि अमली पदार्थांचा संदर्भ कसा जोडता येईल? असा सवाल रोहतगी यांनी उपस्थित केला. आर्यनचा या हस्तगत केलेल्या अमली पदार्थांशी काहीही संबंध नसून त्याचा याच्या खरेदीतही कुठे संबंध असल्याचे पुरावे नाहीत. त्यानं यासाठी कुणालाही पैसे दिलेले नाहीत.
दोन आरोपींना जामीन
विशेष एनडीपीएस न्यायालयाने मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात मनीष राजगीर आणि अविन साहू यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मिळालेले ते पहिले आरोपी आहेत. मनीष राजगीर यांच्यावर २.४ ग्रॅम गांजा बाळगल्याचा आरोप होता आणि अविन साहू यांच्यावर जहाजावर दोन वेळा प्रतिबंधित पदार्थ खाल्ल्याचा आरोप होता. क्रुझवरून या दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, विनंती करुनही एनसीबीने आपल्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी घेतले गेले नसल्याचा दावा अविन साहू याने केला आहे.
एनसीबीने केस मोठी करण्यासाठी अचितकुमारला ड्रग्ज पेडलर ठरवलं
एनसीबीने केस मोठी करण्यासाठीच अचितकुमारला ड्रग्ज पेडलर ठरवलं होतं, असा धक्कादायक दावा अरबाज मर्चंटचे वकील तारक सय्यद यांनी केला आहे. अचितकुमार हा चांगला मुलगा असून आपण त्याला आधीपासून ओळखत आहोत, असा दावाही तारक सय्यद यांनी केला आहे.
आर्यन खान याच्या जामिनावर आज कोर्टात युक्तिवाद करण्यात आला. उद्या या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतर अरबाज मर्चंटचे वकील तारक सय्यद यांनी मीडियाशी संवाद साधताना कोर्टात झालेल्या युक्तिवादाची माहिती दिली. अचित कुमार हा १७ आरोपी आहे. अचितला घरी जाऊन अटक केल्याचं पंचनाम्यात म्हटलं आहे. पण ते खोटं आहे. एनसीबीने केस मोठी करण्यासाठी अचित कुमारला ड्रग्ज पेडलर ठरवलं. मी अचित कुमारला पर्सनली ओळखतो. मला माहीत आहे तो चांगला मुलगा आहे. परदेशात शिकलेला आहे. सुट्टीत आला होता, असं तारक यांनी सांगितलं.
स्मॉल कॉन्टिटीच्या केसेसमध्ये सीएमएम कोर्टाकडे केस चालवण्याची पॉवर असते. मात्र या केसमध्ये हे प्रकरण सीएमएम कोर्टातून काढून मेन्टेबिलिटीचा इश्यू करण्यात आला. त्यामुळे स्मॉल कॉन्टिटिला कमर्शियल कॉन्टिटीहून आणि इंटरमिटरी कॉन्टिटीशी संलग्न करून सेक्शन २९ शी इनव्होक करून सीएमएम कोर्टाच्या ज्युरिसडिक्शनमधून बाहेर काढलं, असं त्यांनी सांगितलं.




