Top Newsफोकस

ठाण्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा; शिवसेना-भाजपची सहमती

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जमीन हस्तांतरण प्रस्ताव बऱ्याच दिवसांपासून रखडलेला होता. अखेर आज ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना आणि भाजप यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे ठाण्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे.

बुलेट ट्रेन जागा हस्तांतरणाच्या प्रस्ताव आज ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. पण या प्रस्तावावरून बराच गोंधळ झाला. तब्बल तीन वेळा सभा तहकूब करण्यात आली होती. तसंच एक वेळा हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला होता. पण अखेर बुलेट ट्रेनसाठीच्या जागा हस्तांतरणाच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे. या महत्वाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रस्तावावरून सुरुवातीला शिवसेनेने विरोध केला असला तरी झालेल्या महासभेत मात्र प्रकल्पासाठी जागा हस्तांतरणाबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये सहमती झाल्याचे चित्र सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले.

दरम्यान, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा झाल्यापासून हा प्रकल्प वादात सापडला आहे. या प्रकल्पातील १२ स्टेशन्सपैकी ८ स्टेशन्स गुजरातेत असल्यानं या प्रकल्प गुजरातच्या बाजूने असल्याचं स्पष्ट झालं होतं. महाराष्ट्रात येणारी स्थानकं : बीकेसी, ठाणे, विरार, बोईसर.

या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात रोजगार संधी उपलब्ध होई. बुलेट ट्रेनच्या कामामुळे त्या मार्गावरील गृहनिर्माण उद्योगाला बळ मिळेल. बुलेट ट्रेनच्या मार्गावर लॉजिस्टिक्स हब तयार होतील. या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यात गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतील. मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावरील भार कमी होईल, असे बोलले जात आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी या ओळखीला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. देशाचा आर्थिक तराजू गुजरातच्या बाजूने झुकल्यास मुंबईच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता आहे. हिऱ्याचा व्यापार गुजरातकडे वळण्याची शक्यता आहे. तसंच, या प्रकल्पात मुंबईला चारच स्थानकं पण गुजरात इतकाच २५ टक्के पैसा द्यावा लागणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button