मुंबई : दिग्दर्शक अकर्ष खुराना आणि अभिनेता अधार खुराना हे त्यांच्या वैविध्यपूर्ण चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अकर्ष खुराना आता त्यांच्या आगामी ‘रश्मी रॉकेट ‘साठी सध्या चर्चेत आहेत. अशातच त्यांनी नवीन सिरीजची घोषणा केली आहे. या सिरीजचे नाव ‘यू स्पेशल ‘ असे आहे . ‘करवा ‘ सारख्या चित्रपटात एकत्र काम केल्यावर अकर्ष खुराना आणि अधार खुराना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे .
सुमित व्यास, तारुक रैना, अर्जुन माथुर, गोपाळ दत्त, परमब्रता चॅटर्जी, रुक्षर ढिल्लों, अहसास चन्ना आदी कलाकार या सीरिजमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या सीरिजमध्ये कॉलेजलाईफचे, कॉलेजवयीन मुलांचे प्रेम, त्यांचा संघर्ष, त्यांची ध्येय गाठण्याची धडपड पाहायला मिळेल. ही सिरीज या वर्षी लायन्सगेट प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.