मनोरंजन

अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

मुंबई : मराठी अभिनेता तसेच बिग बॉस फेम विनोदवीर भूषण कडू याच्यावर दुखा: चा डोंगर कोसळला आहे. भूषण कडू याच्या पत्नीचे म्हणजेच कादंबरी कडू यांचं कोरोनामुळे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी कादंबरीने अखेरचा श्वास घेतला. कादंबरी कडू यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तिच्यावर उपचारही सुरू होते पण शनिवारी कादंबरीची कोरोनाशी झुंझ अपयशी ठरली.

भूषण कडूच्या सबंधित निकटवर्तीयांनी त्याच्या पत्नीच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुरूवातीला कादंबरीला ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच पुढील उपचाराकरिता मुंबई मधील केईएम रुग्णालयातही घेऊन जाण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र कोरोना व्हायरसमुळे कादंबरीच्या प्रकृतीत जास्त बिघाड झाल्याने तिचे निधन झाले. भूषण आणि कादंबरीला ८ वर्षाचं एक लहान मूल असून भूषणच्या संपूर्ण कुटुंब सध्या दु:खी झाले आहेत. इतक्या कमी वयात आणि हसता-खेळता संसार मागे टाकत कादंबरीच्या निधनामुळे अनेकांकडून दुख: व्यक्त केले जात आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेता भूषण कडू आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने मराठी इंडस्ट्रीत नाव मिळवलं ‘कॉमेडी एक्प्रेस’मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले भूषण कडू त्यांच्या विनोदाच्या अफलातून टायमिंगसाठी ओळखले जातात. भूषण कडू ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातही सहभागी झाला होते. त्यातील फॅमिली स्पेशल भागाच्या निमित्तानं भूषण यांच्यासोबत पत्नी कादंबरी व मुलगा प्रकीर्त हे देखील बिग बॉसच्या घरात दिसले होते. कादंबरी यांच्या निधनाबद्दल मराठी मनोरंजनसृष्टीतील मान्यवर कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button