राजकारण
महापालिका निवडणुका लांबणीवर टाकणे अयोग्य : शरद पवार
पुणे : निवडणूक आयोगाने कोरोना साथीचे सर्व नियम पाळून निवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे. महापालिका निवडणूक फेब्रुवारी २०२२मध्ये होणार आहे. सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे. आता निवडणूक एक-दोन वर्षे लांबणीवर टाकणे योग्य वाटत नाही, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
पवार पुण्यात बोलत होते. इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणावरून राज्य सरकारकडून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा दबाव निर्माण केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी भूमिका स्पष्ट केली.