राजकारण

दोन वर्षानंतर भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत आला ही चांगली गोष्ट; जयंत पाटलांची खोचक टीका

मुंबई: सरकार कधी येणार याच्या चर्चा बंद करा. आपण प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करायचं ठरवलं आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे, असा खरमरीत टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

भाजप आता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपने आपले मनोगत व्यक्त केले ही चांगली गोष्ट आहे. आता राज्यातील जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडायला सुरुवात करतील, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

भाजपची काल मुंबईत प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हे विधान केलं होतं. आपल्याला प्रखर विरोधी पक्षनेते बनायचं आहे. जूनपासून आपण काम करत आहोत. सरकार कधी येणार, देवेंद्रजी कानात तर सांगा… आम्ही कुणाला सांगणार नाही… आता ही चर्चा बंद करा. आपण प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार कामही सुरू केलं असून वेळोवेळी तुम्हाला कार्यक्रमही दिले आहेत, असं पाटील म्हणाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button