राजकारण

मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द म्हणजे राज्यातील जनतेचा अपमान : मलिक

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्याच्या राजकारण ढवळून निघालं आहे. नाशिकमध्ये राणेंविरोधात गुन्ह्याची नोंद झाली असून त्यांच्या अटकेचे आदेश निघाले आहेत. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याची भाषा करणं म्हणजे हा मुख्यमंत्र्यांचा नव्हे, तर राज्यातील जनतेचा अपमान आहे. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर कुणी वागत असेल तर कारवाई झालीच पाहिजे, असा आक्रमक पवित्रा नवाब मलिक यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही नारायण राणे यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं आहे. राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. आज चिपळूणमध्ये त्यांच्या यात्रेला सुरुवात होईल. तिथेच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button