Top Newsराजकारण

मंत्री छगन भुजबळ – शिवसेना आ. सुहास कांदे यांच्यात हमरीतुमरी !

मनमाड (नाशिक) : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पूरग्रस्त दौरा वादळी ठरला आहे. कारण छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांची जोरदार हमरीतुमरी झाली. तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या समोर भर बैठकीत आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणिआमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाल. आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. सुहास कांदे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त निधीवरुन तत्काळ मदतीची मागणी केली. सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तत्काळ मदत मिळावी अशी मागणी सुहास कांदे यांनी दिली. यावेळी भुजबळांनीही तशीच मदत दिली जाईल असं सांगितलं. मात्र दोघांची बाचाबाची बराच वेळ चालली.

पालकमंत्री छगन भुजबळ हे नुकसान पाहणी दौऱ्यावर होते. नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर त्यांची लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक होती. या बैठकीला शिवसेना आमदार सुहास कांदे हे सुद्धा उपस्थित होते. या दोघांमध्ये नुकसानीच्या तातडीच्या मदतीवरुन शाब्दिक चकमक सुरु झाली. शब्दाने शब्द वाढत गेला आणि दोघेही मोठ मोठ्या आवाजात भांडू लागले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button