फोकस

गुजरात किनाऱ्यावर पाकिस्तानी बोटीतील १२ संशयितांना अटक

गांधीनगर : भारतीय तटरक्षक दलाने भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करणारी पाकिस्तानी बोट पकडली आहे. या पाकिस्तानी बोटवर १२ लोकं प्रवास करत होते. या सर्व १२ संशयित लोकांना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे.

गुजरातच्या सीमेजवळ घुसखोरांवर नजर ठेवण्यासाठी भारतीय तटरक्षक जहाज ‘राजरतन’ने सर्व्हिलांस मिशन दरम्यान पाकिस्तानी जहाज ‘अल्लाह पवाकल’ शोधले. लगेचच तटरक्षक दलाच्या जवानांनी या जहाजावर कब्जा केला. विशेष म्हणजे वातावरण खराब असल्यामुळे हे पाकिस्तान जहाज ‘राजरतन’च्या नजरेत येत नव्हते. भारतीय तटरक्षक दलाकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, १४ सप्टेंबरच्या रात्री जहाज राजरतने सर्व्हिलांस मिशन दरम्यान या पाकिस्तानी जहाजाचा शोधले. ‘अल्लाह पवाकल’ नावाच्या जहाजावर १२ क्रू मेंबर प्रवास करत होते. गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील ओखा येथे हे जहाज आणण्यात आले असून पुढील तपास केला जात आहे.

यापूर्वी दिल्ली आणि मुंबईसह काही भागांमधून मंगळवारी सहा संशयित दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. कोर्टाने या सहा दहशतवाद्यांची १४ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. हे सहा दहशतवाद्यांवर देशात मोठा हल्ला करण्याचा संशय आहे. परंतु दिल्ली पोलिसांनी हा दहशतवादी कटचा पर्दाफाश केला आहे. आता हे सर्व दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button