स्पोर्ट्स

भारताचा इंग्लंडवर ६६ धावांनी दणदणीत विजय; युवा खेळाडूंची दमदार कामगिरी

पुणे : भारताने इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 66 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडचा डाव अवघ्या 251 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने सर्वाधिक 94 धावांची खेळी केली. तर जेसन रॉयने 46 धावा केल्या. टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. तसेच भुवनेश्वर कुमारने 2 फलंदाजांना बाद केलं. तर कृणाल पंड्याने 1 विकेट घेतली. भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
आपला पहिलाच सामना खेळत असताना युवा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णणने (prasidh Krishna) एक विक्रम रचला आहे. आज
प्रसिधने जी कामिगिरी केली आहे, ती आतापर्यंत एकाही भारतीय गोलंदाजाला करता आलेली नाही.

या सामन्यात आज प्रसिधने अविस्मरणीय गोलंदाजी केली. कारण प्रसिधने भारताला पहिले यश मिळवून दिले. प्रसिध फक्त तेवढ्यावरच थांबला नाही तर या सामन्यात प्रसिधने पहिला आणि अखेरचा बळी मिळवला. त्याचबरोबर पदार्पण करताना आज प्रसिधने चार बळी मिळवले. आतापर्यंत एकाही भारतीय गोलंदाजाला पदार्पण करताना चार बळी मिळवता आले नव्हते. त्यामुळे आता हा विक्रम प्रसिधच्या नावावर जमा झाला आहे. प्रसिधने पदार्पण करताना भारताला पहिले यश मिळवून दिले. प्रसिधने यावेळी जेसन रॉयला ४६ धावांवर बाद केले आणि इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर प्रसिधने बेन स्टोक्स आणि सॅम बिलिंग्स यांना माघारी धाडत तीन विकेट्स पटकावले. त्यानंतर अखेरच्या फलंदाजालाही बाद करत प्रसिधने यावेळी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि सामन्यात सर्वाधिक विकेट्सही मिळवले. प्रसिधने या सामन्यात चार बळी मिळवले, तर शार्दुलने यावेळी तीन बळी मिळवले. युवा शार्दुलने यावेळी स्थिरस्थावर झालेल्या बेअरस्टोला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. बेअरस्टोने यावेळी ९४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यानंतर शार्दुलने कर्णधार इऑन मॉर्गन आणि जोस बटलर यांचा काटा काढला आणि भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. प्रसिध कृष्णन (prasidh Krishna) आणि शार्दुल ठाकूर (shardul Thakur) हे युवा वेगवान गोलंदाज विजयाचे शिल्पकार ठरले. कारण या दोघांनी यावेळी प्रत्येकी तीन विकेट्स मिळवत त्यांचे कंबरडे मोडले आणि संघाला विजय मिळवून दिला. भुवनेश्वर कुमारने यावेळी दोन बळी मिळवत त्यांना चांगली साथ दिली. फिरकी गोलंदाजी हे भारताचे मुख्य अस्त्र समजले जाते. पण आज भारताला विजय मिळवून दिला तो वेगवान गोलंदाजांनी. त्यामुळे भारताचा हा विजय खास ठरतो.

भारताचे प्रसिध कृष्णन आणि शार्दुल ठाकूर (shardul Thakur) हे युवा वेगवान गोलंदाज विजयाचे शिल्पकार ठरले. कारण या दोघांनी इंग्लंडचे कंबरडे मोडले आणि संघाला विजय मिळवून दिला. भुवनेश्वर कुमारने यावेळी दोन बळी मिळवत त्यांना चांगली साथ दिली.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी १३५ धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. पण त्यानंतर प्रसिधने पदार्पण करताना भारताला पहिले यश मिळवून दिले. प्रसिधने यावेळी जेसन रॉयला ४६ धावांवर बाद केले आणि इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर प्रसिधने बेन स्टोक्स आणि सॅम बिलिंग्स यांना माघारी धाडत तीन विकेट्स पटकावले. युवा शार्दुलने यावेळी स्थिरस्थावर झालेल्या बेअरस्टोला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. बेअरस्टोने यावेळी ९४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यानंतर शार्दुलने कर्णधार इऑन मॉर्गन आणि जोस बटलर यांचा काटा काढला आणि भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.

सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांच्या पाठोपाठ केएल राहुल आणि क्रुणाल पंड्या यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडला विजयासाठी ३१७ धावांचे आव्हान दिले आहे. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक ९८ धावा केल्या. त्याचे शतक फक्त दोन धावांनी हुकले. भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली. खेळपट्टी आणि इंग्लंडच्या गोलंदाजीमुळे भारताला वेगाने धावा करता आल्या नाही. सलामीच्या जोडीने अर्धशतकी भागिदारी केली. १६व्या षटकात बेन स्टोक्सने रोहित शर्माला २८ धावांवर बाद केले आणि भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने शिखर सोबत तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. या दोघांनी १०५ धावांची भागिदारी केली. ही जोडी चांगली खेळत असताना विराट कोहली ५६ धावा करुन बाद झाला.

शतकाजवळ पोहोचलेला शिखर ९८ धावांवर बाद झाला. शिखरने १०६ चेंडूत २ षटकार आणि ११ चौकारांसह ९८ धावा केल्या. त्याला बेन स्टोक्सने बाद केले. तर हार्दिक पंड्या १ धावाकरून माघारी परतला. हार्दिक बाद झाला तेव्हा भारताने ४०.३ षटकात २०५ धावा केल्या होत्या. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या क्रुणाल पंड्याने केएल राहुल सह अखेरच्या १० षटकात फटके बाजी केली आणि धावांचा वेग वाढवला. या दोघांनी ५६ चेंडूत १०० धावांची भागिदारी केली. भारताने अखेरच्या १० षटकात ११२ धावा केल्या. राहुलने ४३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६२ धावा केल्या. तर क्रुणालने ३१ चेंडूत ५८ धावा केल्या. यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button