स्पोर्ट्स

अटीतटीच्या सामन्यात भारताचा ८ धावांनी विजय

५ सामन्यांच्या या मालिकेत २-२ बरोबरी; मुंबईकर शार्दुलचा भेदक मारा, सूर्यकुमारचे अर्धशतक

अहमदाबाद : टीम इंडियाने शेवटच्या चेंडूपर्यंत खाल्ल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडवर 8 धावांनी थरारक विजय मिळवला. भारताने इंग्लंडला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडला टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 177 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर जेसन रॉयने 40 धावा केल्या. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकरूने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मुंबईकर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ही जोडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली.

या सामन्यात भारताने दिलेल्या १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकांत ८ बाद १७७ धावाच करता आल्या. सलामीवीर जेसन रॉय (४०), जॉनी बेअरस्टो (२५) आणि बेन स्टोक्स (४६) यांनी फटकेबाजी करत इंग्लंडला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना इतरांची फारशी साथ लाभली नाही. भारताकडून शार्दूल ठाकूरने ४२ धावांत ३ विकेट घेतल्या. त्याला हार्दिक पांड्या आणि लेगस्पिनर राहुल चहर यांनी २-२ विकेट घेत उत्तम साथ दिली. त्यामुळे भारताने हा सामना जिंकत मालिकेत २-२ अशी बरोबरी केली.

तत्पूर्वी इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा (१२) आणि लोकेश राहुल (१४) यांना फार धावा करता आल्या नाहीत. मागील दोन सामन्यांत अर्धशतके करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली केवळ १ धाव करून माघारी परतला. सूर्यकुमारने मात्र दुसऱ्या बाजूने अप्रतिम फलंदाजी करत २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर अखेरच्या षटकांत रिषभ पंत (३०) आणि श्रेयस अय्यर (३७) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने २० षटकांत ८ बाद १८५ अशी धावसंख्या उभारली.

शार्दुलने या सामन्यात सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने 4 ओव्हरमध्ये एकूण 42 धावा दिल्या. यामध्ये त्याने बेन स्टोक्स, इयोन मॉर्गन आणि ख्रिस जॉर्डन या तिघांना बाद केलं. विशेष म्हणजे शार्दुलने निर्णायक वेळी स्टोक्स आणि मॉर्गनला सलग बाद केलं. शार्दुलच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाने सामन्यात पुनरागमन केलं. तसेच शार्दुलने बॅटिंग करताना 4 चेंडूत 2 चौकारांसह महत्वपूर्ण 10 धावा केल्या.

सूर्यकुमार यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या डावात फलंदाजी करताना शानदार अर्धशतकी खेळी केली. सुर्याने 31 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 57 धावांची अफलातून खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला 186 धावांपर्यंत मजल मारता आली.

टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली आहे. यामुळे मालिकेच्या दृष्टीने 5 वा सामना हा रंगतदार होणार आहे. हा 5 वा सामना 20 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button