राजकारण

उत्तर प्रदेशात योगी सरकारवर विश्वास नसल्याचे दिसते : सुप्रिया सुळे

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये आता भाजपचे मंत्री, आमदार राजीनामा देत आहेत. यावरून स्पष्ट होतं आहे की, लोकांना तेथील सरकारबाबत अविश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे तिथं अशी हालचाल दिसू लागली आहे. अशी टीका राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मुलायम सिंह यादव, अखिलेश यादव, जयंत चौधरी यांचे आभार मानते. अखिलेश यादव आणि जयंत चौधरी ज्याप्रकारे लढत आहेत, हे खूप समाधानकारक आहे. नक्की बदल होईल. ज्याप्रकारे केंद्र सरकार निर्णय घेत आहे, एलआयसी असो, जीएसटी कलेक्शन असो हे गंभीर आहे. विरोधकांना देखील यांनी विचारात घ्यायला हवं, असेही सुळे म्हणाल्या आहेत.

आमचं सरकार लोकशाहीला धरून आहे. त्यामुळे प्रत्येकाला मनमोकळेपणे बोलण्याचा आणि संवाद साधण्याचा इथं अधिकार आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांनी असं बोलणं हे योग्य नाही, असे प्रत्युत्तर चंद्रकांत पाटलांना सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. तसेच ओबीसीच्या इंपेरिकल डेटासाठी पंतप्रधान यांना मुख्यमंत्री यांनी अनेकवेळा पत्र लिहिलं आहे. परंतु तरीदेखील त्यांच्याकडून कोर्टात एक आणि संसदेत एक अशी ओबीसी इंपेरिकल डेटाबाबत माहिती दिली जाते, त्यामुळे कुठं तरी भाजपमधील ओबीसींमध्ये खदखद आहे. अशी टीकाही त्यांनी केली आहे.

गोव्यात काँग्रेसने स्वबळाचे संकेत दिल्यानंतर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. त्यामुळे काँग्रेस गोव्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत असेल तर त्यामध्ये गैर काय आहे? असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच १२ निलंबित आमदारांबाबत महाविकास आघाडी नक्कीच योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button