Top Newsराजकारण

ठाण्यात अखेर शिवसेना-राष्ट्रवादीचं ठरलं, तर भाजपचं टेन्शन वाढलं !

ठाणे : मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आघाडीबाबत राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्षांना आदेश दिल्यानंतर त्याच दिवशी लोकमान्य नगरमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना आम्ही दोघे एकत्र होतो. राज्याच्या विकास लक्षात घेउन एकत्र काम करत आहोत, आम्ही नगरविकास विभागाला दिलेले प्रस्ताव तात्काळ मान्य होत असल्याचे सांगून जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. तर म्हाडाच्या माध्यमातून अनेक वर्ष रेंगाळला बीडीडी चाळ असो किंवा नायगांव असो या सर्व भागांचा विकास झाला असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांच्या कामांचे कौतुक केले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी आघाडीकडे एक एक पाऊल पुढे टाकले असल्याचे जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

लोकमान्य चैती नगर परिसरतील विठ्ठल क्रीडा मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यात आली. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे उपस्थिती होते. यावेळी आव्हाड यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी इतिहासातील अनेक गोष्टींना उजाळा दिला.

स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी आपल्या भाषणात, ४० वर्षात लोकमान्य नगर मध्ये सामाजिक अनेक कामे केली असल्याचे सांगितले. लोकमान्य नगर हे दीड ते दोन लाख वस्तीचे गाव आहे. ठाण्यातील ६२ टक्के नागिरीक जे धोकादायक मध्ये राहतात त्यांना सुरक्षित करण्यासाठी एक दिवस ठाणे बंद ठेवले. हे काम शिंदे साहेबानी मनावर घेतले. नागपूर अधिवेशनात आवाज उठवला. जितेंद्र आव्हाड यांनी यामध्ये परिश्रम घेतले आणि महापौरांनी सभागृहात प्रस्ताव मंजूर केला. दोन्ही मंत्र्यांनी क्लस्टरसाठी सिंहाचा वाटा उचलला आहे. १५० एकरचा हा भाग आहे. ५० ते ६० वर्षांपासून वस्ती आहे. ज्या पद्धतीने किसन नगरचे काम वेगाने सुरु आहे तशी लोकमान्य नगर क्लस्टरचा दुसरा क्रमांक लावावा. महाराष्ट्र असं कोणते शहर नसेल जिथे गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री ठाण्याला लाभले आहे. २० ते २५ सहकारी संस्था निर्माण केल्या आहेत. १० हजार नागरिकांचे बायोमेट्रिक झाले आहे. उर्वरित १० हजारांचे बायोमेट्रिक होणार आहे. ज्यावेळी ही योजना जाहीर झाली त्याचवेळी सांगितलं होतं शिंदे साहेब सांगतील तशीच योजना ठिकाणी राबवली जाईल असे जगदाळे यांनी स्पष्ट केले.

म्हाडाच्या योजना स्वीकारा, महिन्यात योजना मार्गी लागेल – आव्हाड

पुनर्विकासाच्या योजना हेच मुंबई ठाण्याच्या विकासाचे गणित आहे. म्हाडाकडे जेवढी जमीन आहे तेवढी कोणाकडे नाही. म्हाडाच्या योजना स्वीकारा, एक महिन्यात तुमची योजना मार्गी लागेल अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने केली आहे. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, म्हाडाच्या एनए टॅक्सवर लागलेली पेनल्टी माफ करण्याची मागणी करण्यात आली होती. ती मान्य केली. पुनर्विकासाच्या योजना हेच मुंबई ठाण्याच्या विकासाचे गणित आहे. म्हाडाकडे जेवढी जमीन आहे तेवढी कोणाकडे नाही. म्हाडाच्या योजना स्वीकारा, एक महिन्यात तुमची योजना मार्गी लागलेली असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. म्हाडाच्या निमित्ताने ३५ वर्ष थांबलेली नायगावचा पुनर्विकस मार्गी लागला आहे. बीडीडी चाळीचाही विकास मार्गी लागला असल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण ठाण्यात क्लस्टरला गती देणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा

एकनाथ शिंदे यांनी राज्यात महाविकस आघाडीचे सरकार आहे. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवरायांचा कारभार असा असावा हे शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे. शिवरायांनी दाखवून दिलेला मार्ग आहे त्या पद्धतीने काम केले तर समाधान लाभेल शिंदे म्हणाले. मुंबईत बीडीडी चाळ असेल, पत्रा चाळ असेल हे काम मार्गी लावण्याचे काम म्हाडाने केले आहे. क्लस्टर केवळ किसन नगरसाठी नव्हे तर हा प्रकल्प संपूर्ण ठाणे शहरासाठी केला आहे. साईराज इमारत पडली तेव्हापासून क्लस्टरसाठी संघर्ष सुरु होता. त्यावेळी सरकार म्हणाले हे अनधिकृत आहे. मी दोन वेळा निलंबित झालो. आम्ही उघड्या डोळ्याने इमारती पडताना पाहणार नाही ही भूमिका घेतली आणि तेव्हा क्लस्टरला मंजुरी मिळाली. क्लस्टरमध्ये यापूर्वी अनेक त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर केल्या. मालकाला सुद्धा मोबदला देऊ केला. मात्र सरकारचा विरोध होता. मला सांगायला आनंद होतो कि आमचे सरकार हे पूर्ण करणार. विकासक येणार नाही हे लक्षात आल्यानंतर सिडको आणि ठाणे महापालिका एकत्र आणून विकास करण्याचे निश्चित केले. तेवढेच प्राधान्य हे लोकमान्य नगरला दिले जाईल. क्लस्टरमध्ये आपण केवळ इमारती बांधणार नसून सर्वांगीण विकास होणार आहे. हक्कांच्या घराच्या स्वप्नपूर्तीकडे येतोय. सर्व कामे बाजूला ठेवा क्लस्टर योजना वेगात राबवा. मुंब्रा,कौसा यासाठीही क्लस्टर हाच पर्याय आहे.

महापौर म्हस्के यांनी दिले आघाडीचे संकेत

लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन होत होते तेव्हा ज्याप्रमाणे व्यासपीठावर एकत्र बसले होते. तसेच चित्र आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळत असल्याचे सांगून महापौर नरेश म्हस्के यांनी देखील यावेळी आघाडीचे संकेत दिले. क्लस्टरसाठी योजना मार्गी लागली आहे. दोन वर्ष सरकारमध्ये आहोत. पण हणमंत जगदाळे सांगायचं आम्ही आणि ऐकायचं हे सर्वाना माहिती आहे. आघाडीत आहोत कि नाही हे कधी पहिले नाही. सत्तेत असलो तरी वेगळा न्याय कोणाला दिला नाही. एकनाथ शिंदे हे क्लस्टर योजना राबवत आहे ते केवळ किसन नगरसाठी नाही तर लोकमान्य, राबोडी, इतर सर्वच ठिकाणी यशस्वी करण्यासाठी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे, पालघरमध्ये शिवसेना, काँग्रेसवर टीका न करण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय

ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली. संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय अवलोकन करण्यात आले. एकमताने महाविकास आघाडी व्हावी, अशीच इच्छा व्यक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे यापुढे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या विरोधात कोणीही बोलू नये, असे आमचे आपापसात ठरवण्यात आले आहे. समोरुन जरी कोणी बोलले तरी प्रत्युत्तर द्यायलाच हवे, असे काही नाही. आपला प्रमुख प्रतिस्पर्धी हा भाजप असून त्यासाठी महाविकास आघाडी आवश्यक आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची असल्याचे मत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीचा निर्णय घेण्यासाठी आव्हाड यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व अध्यक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर ते पत्नकारांशी बोलत होते.

महाराष्ट्रात एकत्न येऊन राज्य पातळीवर एकमेकाला साह्य करत भाजपच्या प्रवृत्तीविरुद्ध आपण लढत आहोत. जसे संजय राऊत यांच्या बाजूने सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आहेत किंवा शरद पवार हे जसे वारंवार सर्वच नेत्यांची बाजू लढवित आहेत. त्याच धर्तीवर राज्यभर पक्षविरहीत वातावरण संपूर्ण राज्यात निर्माण व्हायला हवे, अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांचे मनोमिलन फार गरजेचे आहे. त्यामुळेच सर्वांनी एकमताने महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेची चर्चा करणार का, यावर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. आमच्यातर्फे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे हे चर्चा करणार आहेत. शिवाय, या चर्चेसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर तीन ते चार जणांची समिती नेमण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मुलाखती देत आहेत; त्याकडे पाहता, ते सकारात्मक भूमिका घेत असल्याचे दिसून आल्यानेच आम्ही पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आघाडीमध्ये मतभेद असतात. पण, ते बाजूला सारुन किमान समान कार्यक्रम करुन पुढे जावेच लागते. चर्चेला बसल्यावर अजेंडा ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आघाडीसाठी दोन्ही पक्षातील नेत्यांनी सामंज्यस्याची भूमिका घ्यावी लागते : शिंदे

राज्यात महाविकास आघाडी आहे, त्यामुळे आम्ही आघाडीच्या बाजुने आहोत. आमच्याकडून सुरवातीपासून केव्हा टिकी केली गेली नव्हती. परंतु समोरुन जर टिका होत असेल तर त्याला प्रतिउत्तर हे द्यावेच लागते. त्यामुळे सर्वानी संभाळून बोलावे, आघाडी करायची असेल तर दोन्ही पक्षातील नेत्यांना सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी अशा प्रतिक्रिया ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button