भाजप सत्तेत आल्यानंतर देशात जातीयद्वेष वाढला : शरद पवार
रांची : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रचाराला आता वेग आला आहे. दुसरीकडे केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या एकूणच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर देशात जातीयद्वेषाचे विष वाढत आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला.
रांची येथील हरमू मैदानात आयोजित केलेल्या एका सभेत शरद पवार बोलत होते. बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, परंतु भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे. गेल्या १०० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. पंतप्रधानांना कोलकाता येथे जाण्यास, पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास वेळ आहे. परंतु, दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही, या शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान देणाऱ्या माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे. भारताच्या इंग्लंड दौर्यादरम्यान राहुल द्रविडने मला सांगितले की, कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे त्यांच्या खेळावर परिणाम होत आहे आणि त्याला राजीनामा द्यायचा आहे. या परिस्थितीत सचिन तेंडुलकर यांना कर्णधार होण्यासंदर्भात विचारणा केली. मात्र, त्यानेही नकार दिला, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यावेळी देशाचे नेतृत्व कोण करणार?, असे सचिनला विचारले असता, त्याने धोनीच्या नावाची शिफारस केली. आपल्याकडे एक खेळाडू आहे, जो जगभरात भारतीय क्रिकेट लोकप्रिय करू शकतो, असे सचिनने सांगितले. त्यानंतर धोनीला जबाबदारी देण्यात आली. धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेटला जगभरात मान्यता मिळाली, अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली.