राजकारण

नोकरशाह आमच्या चपला उचलण्याचे काम करतात; भाजप नेत्या उमा भारतींचे वादग्रस्त वक्तव्य

भोपाळ : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी देशातील ब्युरोक्रसीवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी ब्यूरोक्रसी म्हणजेच नोकरशाहीला चप्पल उचलणारे म्हटलं आहे. नोकरशाही म्हणजे काहीच नाही, ते आमच्या चपला उचलण्याचे काम करतात, असं उमा भारती म्हणाल्या.

मध्य प्रदेशात दारुबंदीविरोधात आंदोलन सुरू करणाऱ्या उमा भारती शिवराज सरकारच्या अडचणी वाढवण्याचे काम करत आहेत. आता त्यांच्या या ब्युरोक्रसीवर केलेल्या वक्तव्यामुळे सरकारच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. उमा भारती म्हणाल्या की, नोकरशाही म्हणजे काहीच नाही, ते आमची चप्पल उचलण्यासाठी आहे. ते आमच्या चपला उचलतात. तुम्हाला काय वाटतं नोकरशाह नेत्याला फिरवतात, तसं अजिबात नाही.

आधी खासगीत चर्चा केली जाते, नंतर नोकरशाह फाइल बनवून आणतात. आमच्या सांगण्याशिवाय ते काहीच काम करत नाहीत. आम्ही त्यांना पगार देतो, त्यांना पोस्टिंग देतो. आम्हीच त्यांच प्रमोशन आणि डिमोशन करतो. त्यांना कोणताही अधिकार नाही. ब्युरोक्रसीच्या बहाण्याने आम्हीच राजकारण करतो, असं वादग्रस्त वक्तव्यं त्यांनी केलं आहे.

ओबीसी महासभेच्या शिष्टमंडळाने इशारा दिला होता की, मध्य प्रदेश सरकारला ओबीसी महासभेच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा ओबीसी महासभा रस्त्यावर उतरून भाजप खासदार, आमदार आणि मंत्र्यांचा तीव्र विरोध करेल. या दरम्यान, ओबीसी महासभेच्या शिष्टमंडळाशी बोलताना उमा भारती यांनी नोकरशाहीवर आक्षेपार्ह टिप्पणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button