Top Newsराजकारण

हिंदू सुरक्षित असेल, तर मुस्लीमही सुरक्षित असेल : योगी आदित्यनाथ

लखनौ : जेव्हा दंगल होते, तेव्हा प्रत्येक धर्माच्या आणि पंथाच्या लोकांचे नुकसान होते. जर हिंदूचे घर जाळले तर मुस्लिमाचे घर थोडीच सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित असेल तर मुस्लीमही सुरक्षित असेल. जर हिंदूचे घर सुरक्षित असेल तर मुस्लिमाचे घरही सुरक्षित राहील. आम्ही पाच वर्षांत एकही दंगल होऊ दिली नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, १९९० मध्ये काँग्रेसविरोधी लाटेत विविध पक्षांना सत्ता मिळाली. त्यावेळी रामभक्तांवर गोळीबार करण्याचे पाप समाजवादी पक्षाने केले. केवळ १९९० मध्येच नाही तर त्यानंतरही समाजवादी पक्षाला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली, तेव्हा तेव्हा कोणालाही सुरक्षित वाटत नव्हते. सपा सरकारच्या काळात राज्य दंगलीच्या आगीत जळत होते. आज आपण म्हणून शकतो, की आम्ही राज्य दंगलमुक्त केले.

अयोध्या-काशीनंतर मथुरेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री योगी म्हणाले, भूतकाळातील वैभवाची पुनर्स्थापना करण्याची मोहीम चालवली जात आहे. आपल्याला भारत आणि भारतीयत्वाचा अभिमान वाटावा, याचा हा भाग आहे. आम्ही मथुराही बनवू. ज्यांच्यामध्ये दम असेल, तेच मथुरा बनवतील, असे योगी म्हणाले.

योगी म्हणाले, काही लोक म्हणत होते, की निकाल आला तर रक्ताच्या नाद्या वाहतील. त्यांनी पाहिले आहे, की आम्ही कशा पद्धतीने भव्य राम मंदिर उभारण्याच्या दिशेने अग्रेसर झालो आहोत. राष्ट्रवाद हा आमचा अजेंडा आहे. राम मंदिर हा सांस्कृतिक राष्ट्रवादाचा भाग आहे. विश्वनाथ धाम आणि कुंभ हेही त्यचाच भाग आहेत. पवित्र भूमी भव्य-दिव्य बनविणे हा आमच्या राष्ट्रवादाचा भाग आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button