Top Newsराजकारण

नैतिकतेशी कुठल्याही प्रकारची तडजोड नाही; नवज्योतसिंग सिद्धूंनी मौन सोडले

चंदिगढ : पंजाबमध्ये राजकीय गोंधळ सुरू असतानाच नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत आपली मौन सोडले आहे. यात, आपण शेवटच्या श्वासापर्यंत हक्क आणि सत्याची लढाई लढत राहणार. तसेच नैतिकतेशी कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असे सिद्धूंनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर भ्रष्ट मंत्र्यांना पुन्हा आणण्याचा निर्णय आपण कधीही स्वीकारणार नाही, असेही सिद्धू यांनी म्हटले आहे.

सिद्धू म्हणाले, १७ वर्षांचा राजकीय प्रवास एका उद्देशाने केला. पंजाबमधील नागरिकांचे जीवन सुधारणे आणि एखाद्या मुद्द्यावरील राजकारणावर एक स्टँड घेऊन उभे राहणे, हाच माझा धर्म आहे आणि हेच माझे कर्तव्यही आहे. माझे काही वैयक्तिक भांडण नाही. मात्र, माझी लढाई मुद्द्यांची आहे. पंजाबच्या भल्यासाठी उभे राहणे हा माझा अजेंडा आहे आणि मी त्याच्याशी तडजोड करू शकत नाही आणि मी सत्यासाठी लढत राहणार.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा मंगळवारी राजीनामा दिला. यानंतर काँग्रेससमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमधील त्यांच्या जवळच्याच एका मंत्र्याने मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या मंत्रिमंडळातूनही राजीनामा दिला आहे. मानले जाते की, पंजाबमधील नव्या मंत्रिमंडळात आपल्या लोकांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आणि उच्च पदांवर आपल्या लोकांची पोस्टिंग न केल्याने सिद्धू नाराज आहेत आणि यामुळेच त्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे पंजाबचे राजकारण ढवळून निघत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button