अर्थ-उद्योग

मुकेश अंबानींच्या घराबाहेरील ‘त्या’ स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ 25 फेब्रुवारीला संशयित स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याने तपास यंत्रणा अलर्ट झाली होती. मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी 25 फेब्रुवारीला सापडली होती. 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ सापडली होती, तिच्या मालकाचा मृतदेह मुंब्र्यातल्या खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन असं गाडीमालकाचं नाव आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे. पण पोलीसांसमोर ते हजर झाले त्यावेळेस ते काय म्हणाले होते ते नक्की ऐका. त्यांचा हा जवळपास तीन मिनिटांचा व्हिडीओ आता ह्या प्रकरणात महत्वाचा ठरणार आहे.

देवेंद्र फडणवीसांचे सचिन वाझेंवर गंभीर आरोप
फडणवीस यांनी विधानसभेत मुकेश अंबानींच्या घराबाहेर जी जिलेटिन भरलेली स्कॉर्पिओ मिळाली होती, त्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. मनसुख हिरेन यांची ही गाडी होती. त्यांची गाडी चोरीला गेली होती. त्यांची गाडी बंद झाली तिथून ते क्रॉफर्ड मार्केटला आले होते. तिथे ते एका व्यक्तीला भेटले, तो व्यक्ती कोण? हे या प्रकरणाचं मूळ आहे. ही गाडी जिथे सापडली, तिथे लोकल पोलिसांच्या आधी सचिन वाझे हे कसे पोहोचले? त्यांनाच धमकीची ती चिठ्ठी कशी मिळाली. सचिन वाझे यांचं घर ठाण्यात, जी गाडी चोरी झाली ती सुद्धा ठाण्यातील, इतकंच नाही जी गाडी चोरी होऊन ज्या रुटने आली आणि तिथे पार्क झाली, तिच्यासोबत सफेद इनोव्हा ठाण्यातूनच आली. एक गाडी पार्क झाली आणि एक निघून गेली. त्याच सचिन वाझे यांना IO म्हणजे तपास अधिकारी नेमलं.

सचिन वाझे सगळ्यात आधी पोहोचले. त्यांनी चिठ्ठी हातात घेतली,. त्यांनाच चौकशी अधिकारी नेमलं. आश्चर्य म्हणजे जून-जुलैमध्ये २०२० मध्ये सचिन वाझेंचं या गाडी मालकाशी संभाषण झालं होतं.. योगायोग म्हणजे गाडीमालक ठाण्यातले, आयओ ठाण्यातले, ही गाडी ठाण्यातली, त्याच्यासोबत एक गाडी आली ती ठाण्यातूनच आली, त्यापेक्षा संशयास्पद बाब म्हणजे एका टेलिग्राम चॅनलवर एक संघटनेच्या नावाने जयशूल हिंद हा आम्ही अटॅक केलीय, ही गाडी आम्ही ठेवलीय, आम्हाला रॅनसम द्या, क्रिप्टो करन्सी द्या असं पत्र प्रसिद्ध झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी जय शूल या संघटनेने एक मेल पाठवला आणि सांगितलं आमचा याच्याशी संबंध नाही.

यामध्ये मी एक शक्यता वर्तवली होती, यातील सर्वात महत्त्वाचा दुवा मनसुख हिरेन हे होते. त्यांना तात्काळ सुरक्षा द्यायला हवी. मला आताच माहिती मिळाली, मनसुख हिरेन यांची बॉडी ठाण्याजवळ मुंब्र्याच्या जवळपास सापडली आहे, त्यामुळे हे प्रकरण गंभीरच नाही तर अत्यंत गुंतागुंतीचं आणि सर्वांकरिता चॅलेंजिग आहे. मला वाटतं हा जो योगायोग आहे, यातून जो संशय तयार झालाय आणि इतका प्राईम विटनेसची बॉडी मिळते, निश्चितच यामध्ये काही गौडबंगाल आहे. त्यामुळे ही केस तात्काळ एनआयएला दिली पाहिजे आणि यामागील सत्य बाहेर यायला हवं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button