अर्थ-उद्योग

‘मायको’ वातानुकूलीत गाड्यांतून आंबा थेट ग्राहकापर्यंत पोहोचवणार!

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढत असल्याने नागरिकांची काहिली होत आहे. हवामानातील बदल आणि वाढत्या उष्म्याचा फटका हापूसवरही पडतो आहे. एरवी सोनेरी झळाळी असणारा आंबा तापमान वाढीमुळे काळवंडलेला, डाग पडलेला दिसतो. पण आंबा प्रेमींना कोकणातील अस्सल हापूस आंब्याची गोडी चाखता यावी, नैसर्गिकरित्या पिकवलेल्या उत्तम दर्जाच्या हापूसचा आनंद घेता यावा यासाठी ‘मायको’ने पाऊल उचलले आहे. ग्राहकांना उत्तम प्रतिचा, चांगला आंबा घरपोच मिळावा यासाठी ‘मायको’ने वातानुकूलित गाड्यांची ( रिफर व्हॅन्स) सोय केली आहे. आंबा खराब होऊ नये आणि आंब्याचा दर्जा कायम रहावा यासाठी लागणारे विशिष्ट तापमान या गाडीचे असेल. या गाड्यांचा शुभारंभ परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते २८ मार्च २०२१ रोजी करण्यात आला.यावेळी ‘ग्लोबल कोकण’चे संस्थापक संजय यादवराव, ‘मायको’च्या सह संस्थापक राजश्री यादवराव, सुप्रिया मराठे, सुनयना रावराणे आणि ‘ग्लोबल कोकण’चे संयोजक किशोर धारिया उपस्थित होते.

कोकणातील शेतात पिकलेला हापूस ग्राहकापर्यंत जशाचा तसा पोहोचावा यासाठी ‘मायको’द्वारे वातानुकूलित गाड्यांची जी सोय करण्यात आली आहे ती अतिशय चांगली आहे. आंबे पिकवण्यासाठी त्यावर रसायन फवारले जातात, केमिकलचा वापर होतो अशा अनेक अफवा ऐकायला येतात. अशा कोणत्याही अफवा लोकांपर्यंत पोहोचू नये आणि आंब्याची सुरक्षित वाहतूक करत नैसर्गिकरित्या पिकवलेला अस्सल हापूस ग्राहकापर्यंत पोहोचावा यासाठीचा हा उपक्रम वाखणण्याजोगा आहे. तसेच ‘मायको’द्वारे पाठविल्या जाणाऱ्या आंब्याच्या प्रत्येक पेटीवरील क्युआर कोड स्कॅनिंगच्या माध्यमातून शेतात आंबा कसा पिकवला जातो, किती मेहनत केली जाते अशी सर्व पारदर्शक प्रक्रिया ग्राहकांना व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि माझ्यातर्फे या संपूर्ण योजनेला शुभेच्छा अशा भावना परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केल्या.

कोकणातील शंभर शेतकऱ्यांनी एकत्र येत बनवलेल्या देशातील पहिल्याच ‘मायको’ या मँगोटेक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतातील हापूस थेट जगभरातील बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. हापूस हाताळण्यासाठी अतिशय नाजूक फळ आहे. हापूसची बाजारपेठेत किंवा इतर प्रवासावेळी ने-आण करताना खूप काळजी घ्यावी लागते. योग्य ती काळजी न घेतल्याने आंब्यांचे नुकसान होते. पण ग्राहकांना उच्च प्रतीच्या, चांगल्या, दर्जेदार आंब्याची गोडी चाखता यावी यासाठी वातानुकूलित गाड्यांची सोय करण्यात आली आहे, असे ‘ग्लोबल कोकण’चे संस्थापक संजय यादवराव म्हणाले.

हापूसची साल ही अतिशय पातळ असते. तीव्र उन्हामुळे आंब्यांची साल भाजल्याने अनेकदा आंबे काळवंडले जातात. त्यामुळे खराब झालेला आंबा फेकून द्यावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांचेही प्रचंड आर्थिक नुकसान होते. शेतकरी, आंबा बागायतदार यांचे नुकसान होऊ नये आणि ग्राहकांनाही चांगल्या दर्जाचा आंबा मिळावा यासाठी आम्ही वातानुकूलित गाड्यांची सोय केली आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत ३ गाड्या दाखल झाल्या असून ठाणे आणि नवी मुंबईतही या गाड्यांची सेवा येत्या काही दिवसात सुरु करण्यात येणार आहे, असे ‘मायको’च्या सह संस्थापक सुप्रिया मराठे म्हणाल्या. मायकोच्या वेबसाईटवरून ग्राहकांनी आंबे ऑनलाईन ऑर्डर केल्यावर त्यांना या गाड्यांमधून आंब्यांची घरपोच डिलिव्हरी केली जाईल, असेही त्या पुढे म्हणाल्या.

गेल्या वर्षी कोरोनामुळे बाजारपेठ बंद झाली असतानाही शेतकरी थांबला नाही. उलट त्यांनी आंब्यांची थेट विक्री केल्याने त्यांना नेहमीपेक्षा दुप्पट भाव मिळाला. शेतकऱ्यांच्या अथिक परिश्रमांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ‘मायको’ या ग्लोबल स्तरावरील मँगोटेक प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. http://www.mykofoods.com/ या संकेतस्थळामुळे कोकणातील जीआय टॅग हापूस जगभरातील आंबा प्रेमींना सहज उपलब्ध होत आहे. शेतकर्‍यांना स्वावलंबी आणि समृद्ध बनविणारा ‘मायको’चा हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालू आहे. सध्या मुंबई, महाराष्ट्रसह परदेशातही मोठ्या प्रमाणात ग्राहक आंबा ऑनलाईन खरेदी करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button