Top Newsअर्थ-उद्योग

मोदी सरकारचे हेच का ‘अच्छे दिन’ ! मुंबईत पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली

मुंबई : देशात एकीकडे कोरोना संकटामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला असतानाच दुसरकडे इंधन दरवाढीने त्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत करुन टाकली आहे. त्यामुळे दर दिवसाआड होणाऱ्या इंधन दरवाढीने आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून देशातील सर्वसामान्य जनतेला मरणाच्या दारात नेवून ठेवले आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.

सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलची भाव केली जात आहे. आजही पेट्रोल- डिझेलच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. आज पेट्रोल २५ ते २६ पैसे आणि डिझेल २८ ते ३० पैशांनी महागले आहे. तर मुंबईत पेट्रोल शंभरी पार केली आहे. इंधन दरवाढीवरून हैराण झालेल्या नागरिकांकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. काँग्रेसचा कार्यकाळात इंधन दरवाढ होताच रस्त्यावर उतरणारे भाजपचे नेते आणि महिला पदाधिकारी आता मात्र या विषयावर एक शब्द बोलत नसल्याबद्दल जनतेत तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

मुंबईत आज शनिवारी एक लीटर पेट्रोलचा भाव १००.१९ रुपयांवर झाला आहे. दिल्लीत आजच पेट्रोल ९३.९४ रुपयांवर पोहचला आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.५१ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९३.९७ रुपये झाला आहे. मुंबईत आजचा एक लीटर डिझेलचा भाव ९२.१७ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८४.८९ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ८९.६५ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८७.७४ रुपये प्रती लीटर झाले आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलची किंमत?

पेट्रोल डिझेलचा दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईल वेबसाईटनुसार, तु्म्हाला RSP (पेट्रोल पंपचा डीलर कोड टाइप करा) आणि शहराचा कोड 9224992249 क्रमांकावर पाठवू शकता. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. तो तुम्हाला आईओसीएल वेबसाईटवर मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button