Top Newsस्पोर्ट्स

पहिल्या कसोटीत न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य

भारताचा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित; श्रेयस अय्यरची पुन्हा अर्धशतकी खेळी

कानपूर : कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ५ बाद ५१ धावांवर असलेल्या टीम इंडियाच्या मदतीला पुन्हा एकदा पदार्पणवीर श्रेयस अय्यर धावला. त्याच्या जोडीला आर अश्विन खेळपट्टीवर ठाण मांडून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना भिडला. दुखापतीमुळे क्षेत्ररक्षणासाठी न उतरलेला वृद्धीमान सहा यानंही अर्धशतकी खेळ करून भारताच्या डावात मोठा वाटा उचलला. त्याला अक्षर पटेलची साथ मिळाली आणि भारतानं या खेळाडूंच्या जोरावर न्यूझीलंडसमोर तगडं आव्हान उभं केलं. भारतीय संघानं पहिल्या कसोटीत न्यूझीलंड संघासमोर विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा किवींनी सलामीवीर विल यंग ( २) याची विकेट गमावत १ बाद ४ धावा केल्या आहेत. आता अखेरच्या दिवशी विजयासाठी न्यूझीलंडला २८० धावा, तर टीम इंडियाला ९ विकेट्स हव्या आहेत.

श्रेयस- अश्विन माघारी परतल्यानंतर आता टीम इंडियाचा डाव गडगडेल असे वाटले, परंतु वृद्धीमान सहा व अक्षर पटेल यांनी किवी गोलंदाजांना झुंजवले. या दोघांनी ८व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दुखापतग्रस्त असूनही सहा खेळपट्टीवर चिटकून बसला अन् त्यानं अर्धशतकही पूर्ण केलं. या जोडीनं ७ बाद १६७ धावांवरून टीम इंडियाला ७ बाद २३४ धावांपर्यंत मजल मारून दिली. सहा ६१ व अक्षर २८ धावांवर नाबाद राहिले.

भारतानं ४९ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाची सुरुवात केली. पण, शुबमन गिल ( १), अजिंक्य रहाणे ( ४), चेतेश्वर पुजारा ( २२), मयांक अग्रवाल ( १७) आणि रवींद्र जडेजा ( ०) हे झटपट माघारी परतल्यानं भारताची अवस्था ५ बाद ५१ अशी झाली होती. मात्र, आर अश्विन व श्रेयस अय्यर या जोडीनं खिंड लढवताना संघाच्या खात्यात ५२ धावांची भर घातली. जेमिन्सननं ही जोडी तोडताना अश्विनला ( ३२) बाद केलं. श्रेयस आत्मविश्वासानं खेळला. त्यानं दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून मोठा पराक्रम केला. पदार्पणाच्या सामन्यात शतक व अर्धशतक झळकावणारा श्रेयस हा पहिला भारतीय ठरला आहे. त्यानं पहिल्या डावात १०५ धावा केल्या होत्या. त्याची ही घोडदौड टीम साऊदीनं रोखली. त्यानं चौथ्या दिवशी १२५ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६५ धावा करताना संघाला मोठी आघाडी मिळवून दिली.

पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये श्रेयसनं तिसरे स्थान पटकावले. त्यानं १७० धावा करून लाला अमरनाथ यांचा १५६ (३८+११८ वि. इंग्लंड, १९३३) धावांचा विक्रम मोडला.श्रेयस- अश्विन माघारी परतल्यानंतर आता टीम इंडियाचा डाव गडगडेल असे वाटले, परंतु वृद्धीमान सहा व अक्षर पटेल यांनी किवी गोलंदाजांना झुंजवले. या दोघांनी ८व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दुखापतग्रस्त असूनही सहा खेळपट्टीवर चिटकून बसला अन् त्यानं अर्धशतकही पूर्ण केलं. या जोडीनं ७ बाद १६७ धावांवरून टीम इंडियाला ७ बाद २३४ धावांपर्यंत मजल मारून दिली. भारतानं किवींसमोर २८४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सहा ६१ व अक्षर २८ धावांवर नाबाद राहिले.

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं सलामीवीर विल यंगची विकेट गमावली. पण, ती विकेट आर अश्विनला नशिबानं मिळाली. त्यावरून बराच वेळ खेळपट्टीवर चर्चा रंगली. न्यूझीलंडची दुसऱ्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. पहिल्या डावातील अर्धशतकवीर विल यंग ( २) पायचीत झाला. त्यानं DRS घेतला असता तर आर अश्विनला ही विकेट मिळाली नसती. अश्विननं या विकेटसह हरभजन सिंगच्या ४१७ विकेट्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. विल यंग व टॉम लॅथम यांनी चर्चा करण्यात एवढा वेळ घेतला की १५ सेंकदाचा अवधी निघून गेल्यानंतर यंगनं डीआरएससाठी अपील केले. पण भारतीय खेळाडूंनी त्याला विरोध केला. चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडनं १ बाद ४ धावा केल्या आणि त्यांना पाचव्या दिवशी २८० धावा करायच्या आहेत, तर भारताला विजयासाठी ९ विकेट्स घ्यायच्या आहेत.

भारतानं आतापर्यंत एकदाच दुसरा डाव ३०० पेक्षा कमी धावा असताना घोषित करून विजय मिळवला आहे. लॉर्ड्सवर २०२१मध्ये इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. भारतानं कसोटीचा संपूर्ण एक दिवस शिल्लक असताना दुसऱ्या डावात २८३ धावांच्या आघाडीवर डाव घोषित करण्याची ही सर्वात निचांक धावसंख्या आहे. याआधी १९६४मध्ये इंग्लंडविरुद्ध ३१६ धावांचे लक्ष्य ठेवून भारतानं डाव घोषित केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button