अर्थ-उद्योग

पराग मिल्क फूड्स लिमिटेड उभारणार ३१६ कोटी रुपये

मुंबई : पराग मिल्क फूड्स लिमिटेड या भारताच्या दुग्धउत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या एफएमसीजी कंपनीने इक्विटी शेयर्स, फॉरिन करन्सी कन्व्हर्टिबल बाँड्सचे (एफसीसीबी) (परकीय चलन परिवर्तनीय रोखे) प्राधान्य वाटप आणि परिवर्तनयी समभागांच्या वाटपातून 136 कोटी रुपये उभारणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयास 26 एप्रिल 2021 रोजी होणार असलेल्या आगामी विशेष सर्वसाधारण सभेत (ईजीएम) समधारकांची तसेच नियामक मंजुरी मिळणे प्रस्तावित आहे.

पराग मिल्क फूड्सवर असलेला विश्वास दृढ करण्यासाठी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनने (आयएफसी) इक्विटी शेयर्सचे प्राधान्य वाटप सबस्क्रिप्शन आणि एफसीसीबीचे सबस्क्रिप्शन तसेच डिसेंबरमधे होणार असलेले 150 कोटी रुपयांचे एनसीडीचे प्रस्तावित सबस्क्रिप्शन यांच्याद्वारे 155 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावित गुंतवणुकीमधे 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 67,56,757 इक्विटी शेयर्सचे 111 रुपये (प्रती शेयर 101 रुपये प्रीमियमसह) दर्शनी मूल्यासह प्राधान्य वाटप केले जाणार असून त्याद्वारे एकूण 75 कोटी रुपये उभारले जातील. त्याशिवाय या प्रस्तावित गुंतवणुकीचा एक भाग म्हणून आयएफसीला लागू कायद्यानुसार, खासगी प्लेसमेंटद्वारे प्रती शेयर रू. 145 आणि रिडम्प्शनसाठी 5 वर्षांच्या मुदतीसह 11 दशलक्ष डॉलर्सपर्यंतचे फॉरिन करन्सी कन्व्हर्टिबल बाँड्सच्या (एफसीसीबी) सबस्क्रिप्शन घेण्याची ऑफर दिली जाईल.

भारतातील पहिला देशांतर्गत, ग्राहककेंद्रित व्हेंचर फंड असलेल्या सिक्स्थ सेन्स व्हेंचर अडव्हायजर एलएलपीनेही कंपनीवर विश्वास दाखवत 50 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव मांडला आहे. 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 45,04,505 इक्विटी शेयर्सचे प्रत्येकी रू. 111 (प्रती शेयर 101 रुपये प्रीमियमसह) किंमतीला प्राधान्य वाटप करून ही गुंतवणूक उभारली जाणार आहे.

प्रवर्तक 111 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यात देवेंद् प्रकाश शहा यांच्या नावे असलेल्या 50,00,000 कनव्हर्टिबल शेयर्सचे प्राधान्य वाटप आणि श्रीमती नेत्रा प्रितम शहा यांना 50,00,000 कनव्हर्टिबलचे इक्विटी शेयर्समधे प्राधान्य क्रमानुसार रू. 1 प्रत्येकी पूर्णपणे पेड-अप आणि रू. 111 (रू. 101 प्रीमियमसह) यांचा समावेश आहे. यासह कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा 46 टक्के राखला जाणार आहे.

याविषयी अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले, ‘महासाथीच्या दरम्यान कंपनीवर सातत्याने विश्वास आणि पाठिंबा दर्शवल्याबद्दल आम्ही सध्याच्या समभागधारकांचे आभार मानतो. आयएफसी आणि सिक्स्थ सेन्स व्हेंचर्स यांसारख्या प्रतिष्ठित गुंतवणुकदारांनी कंपनीच्या विकास करण्याच्या क्षमतेवर विश्वास दाखवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो व स्वागत करतो. महत्त्वाच्या ग्राहक श्रेणींवर लक्ष केंद्रित करत पराग मिल्क फूड्सने या काळात मोठी झेप घेतली तसेच सध्या कंपनीची दीर्घकालीन कामगिरी उंचावण्यासाठी भर दिला जात आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘दोन वर्ष मोरोटोरियम असलेल्या ठिकाणी लघुकालीन कार्यकारी भांडवलाच्या जागी एनसीडी आणण्याचा तसेच कर्जाचा एकंदर बोजा कमी करण्याचा विचार आम्ही करत आहोत. एफसीसीबीद्वारे उभारला जाणारा हा निधी पुढील दोन वर्षांतील आमच्या भांडवलविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार असून त्या दरम्यान आमच्या रोखीचा प्रवाह मोकळा होईल. त्या व्यतिरिक्त प्रेफरन्सियल शेयर्स आणि वॉरंट्समधून जमा झालेली निधी लघुकालीन कर्ज मर्यादा कमी करण्यासाठी तसेच भविष्यातील विकासासाठी कार्यकारी भांडवल वाढवण्यासाठी वापरला जाईल. यामुळे ताळेबंद आणखी मजबूत होईल तसेच कंपनीच्या भविष्यातील वाढीला चालना मिळेल.’

कंपनीत झालेली गुंतवणूक बाजारपेठेला आमच्या स्थिर उत्पन्न मिळवून देण्याच्या, आखलेले धोरण अमलात आणण्याच्या आणि दीर्घकाळात नफ्यासह विकास करण्याच्या क्षमतेवर विश्वास असल्याचे प्रतीक आहे. आम्ही प्रवर्तक दीर्घकालीन धोरणासाठी पूर्णपणे बांधील आहोत. प्रस्थापित ब्रँड्स आणि नाविन्यपूर्ण उत्पादन श्रेणीच्या मदतीने ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. विविध उत्पादन विभागांतील मागणी पूर्णपणे पुनरूज्जीवीत करून आम्ही दमदार कार्यकारी आणि आर्थिक कामगिरी करू अशी खात्री आम्ही समाभागधारकांना देत आहोत.

सिक्स्थ सेन्स व्हेंचर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल व्होरा म्हणाले, ‘100 अब्ज डॉलर्सपेक्षा मोठ्या दुग्ध क्षेत्रातील (भव्य क्षेत्र) पहिल्या पिढीच्या संस्थापकांवर (प्रभावी प्रवर्तक), नव्या युगातील ग्राहकांसाठीची अनोखी उत्पादने (स्मार्ट उत्पादने) विश्वास दाखवण्याच्या सिक्स्थ सेन्सच्या धोरणामधे पराग मिल्क फूड्स चपखलपणे बसते. आमच्या मते भारतातील ब्रँडेड दुग्ध क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारणार असून असंघटित क्षेत्रातले ग्राहक (सध्या 75 टक्के) विविध उत्पादन विभागांद्वारे संघटित क्षेत्राकडे वळतील. पराग मिल्क फूड्स आपल्या धोरणात्मक पद्धतीने तयार केलेल्या दुग्ध उत्पादनांसह ग्राहकांच्या बदलत्या आवडींचा योग्य लाभ करून घेण्यासाठी सज्ज आहे.’

परागने ‘गायीचे दूध’ या संकल्पनेभोवती फिरणारी विविध प्रकारची उत्पादने पहिल्यांदाच बाजारपेठेत उपलब्ध केली असून चीझ विभागात वर्चस्व (35 टक्क्यांइतके) स्थापन केले आहे. जर ब्रँड एकीकडे मोठ्या मोठ्या कूप्सच्या तुलनेत शेल्फ्सवर जागा मिळवू शकत असेल आणि दुसरीकडे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सामना करू शकत असेल, तर तो नक्कीच आकर्षक व्यवहार असेल. ‘उद्याच्या ग्राहकांना’ सेवा देणारी (व्हे प्रोटीन, ब्रँडेड पनीर, दही इत्यादी) उत्पादनांची श्रेणी, दमदार पुरवठा साखळी आणि चांगले भांडवल असलेला ताळेबंद यांसह पराग देशातील सर्वाधिक पसंतीचा खासगी डेयरी ब्रँड बनवण्यासाठी सज्ज आहे असे आम्हाला वाटते.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button