अर्थ-उद्योग

एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सची विस्तार योजना

मुंबई : भारताचा सर्वात वेगाने विस्तारत असलेला इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रॅण्ड एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सने आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीमध्ये २०० हून अधिक डीलर्सच्या सहयोगाची योजना आखली आहे. हे धोरणात्मक पाऊल देशभरात विश्वासार्ह, टिकाऊ आणि परवडण्याजोगी ई-वाहतुक उपाययोजना पुरवत कंपनीच्या कार्यकक्षेची व्याप्ती वाढविण्याच्या धोरणाशी मेळ साधणारे आहे.

एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सने गेल्या सात महिन्यांमध्ये चमकदार वाढ नोंदवली आहे. प्रत्येक महिन्यामध्ये मागील महिन्याच्या तुलने ३५० टक्‍के वाढ आणि विक्रीमध्ये प्रत्येक मागील महिन्याच्या तुलनेत ४०० हून अधिक टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. भारतभरातील १०० शहरांमध्ये चांगला जम बसविलेल्या कंपनीने गेल्या चाळीस दिवसांमध्ये आणखी ५० डिलर्स जोडले आहेत. सध्या या ई-मोबिलिटी ब्रॅण्डकडे १५० डीलर्स आहेत व आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ३५० हून अधिक डीलर्सशी सहयोग साधण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

एएमओ मोबिलिटीचे प्रवक्ता म्हणाले, “एएमओने गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड वाढ नोंदवली आहे. आजघडीला कंपनीकडे १५० हून अधिक डीलर्स आहेत आणि भारताच्या २५० हून अधिक शहरांमध्ये आपले नेटवर्क विस्तारण्याची आमची योजना आहे. सध्यापुरते आम्ही आर्थिक वर्ष २०२२ च्या अखेरीपर्यंत सुमारे ३५० डीलर्स आपल्या कंपनीशी जोडून घेण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. डीलर्सबरोबर केलेल्या सहयोगामध्ये जोमदार वाढ घडवून आणत देशभरात आपली पुरवठा क्षमता अधिक बळकट करू शकू आणि हे करताना अधिक व्यापक क्षेत्रावर आपल्या पाऊलखुणा उमटवू शकू. इतकेच नव्हे तर येत्या महिन्यांमध्ये अधिक पर्यावरण-स्नेही वाहन उपाययोजना आणण्यासाठी आम्ही संशोधन आणि विकासाचे काम अथकपणे करत आहोत.“

आपली नवीन ई-मोबिलिटी उत्पादने बाजारात दाखल करण्यासाठी सज्ज असलेल्या एएमओ इलेक्ट्रिक बाइक्स कंपनीने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १ लाख युनिट्स विकण्याचे लक्ष्य आखले आहे. इतकेच नव्हे तर कंपनी नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनांच्या संशोधन व विकासामध्ये नव्याने गुंतवणूकही करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button