अर्थ-उद्योगआरोग्य

‘गोदरेज फूड ट्रेंड्स रिपोर्ट 2021’च्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन

मुंबई : ‘गोदरेज फूड ट्रेंड्स रिपोर्ट 2021’च्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन ‘गोदरेज’तर्फे व्हर्च्युअल पद्धतीने आज करण्यात आले. खाद्य उद्योगातील डायनिंग-इन, डायनिंग-आउट, बीव्हरेज, डेझर्ट्स, किचन डिझाइन आदींमधील सध्याच्या ट्रेंड्सची माहिती देणारा ‘गोदरेज फूड ट्रेंड्स रिपोर्ट 2021’ हा समग्र मार्गदर्शक आहे. या चौथी आवृत्तीने पूर्वीच्या आवृत्त्यांना मागे टाकले आहे. ईशान्येकडील राज्ये, तसेच देशभरातील लहान शहरे व गावे येथील खाद्यसंस्कृती, तेथील विविध निरीक्षणे यांचा या अहवालात समावेश करण्यात आला आहे; त्यामुळे ‘जीएफटीआर 2021’ अधिक समृद्ध झाला आहे. यंदाच्या या अहवालात 200 हून अधिक तज्ज्ञांनी आपली सूक्ष्मदृष्टी, निवडी आणि तपशीलवार अभिप्राय नोंदविले आहेत. त्यांचे एकत्रित विश्लेषण करून त्यातून 2021 या वर्षासाठीचे भाकीत जाणून घेण्यात आले आहे.

या अहवालाविषयी बोलताना ‘गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड’ व तिच्या सहयोगी कंपन्यांचे उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट ब्रँड व कम्युनिकेशन्स विभागाचे प्रमुख सुजित पाटील म्हणाले, “खाद्य उद्योगातील अव्वल शेफ, रेस्टॉरंट्सचे मालक, इतिवृत्तकार, परीक्षक आणि विचारवंत यांच्याकडून या उद्योगातील विविध कल आणि सूक्ष्मदृष्टी यांचे संकलन करून, ‘गोदरेज फूड ट्रेंड्स रिपोर्ट’ बनविण्यात येतो. या अहवालासाठी नियमित प्रतिसाद देणाऱ्या आणि प्रथमच यात सहभागी होणाऱ्या सुमारे 200 जणांमुळे हा अहवाल अधिकाधिक व्यापक बनला असून गेल्या अनेक वर्षांत तो निरंतर वाढत गेला आहे. ‘गोदरेज फूड ट्रेंड 2021’ अहवाल हा प्रत्येक खाद्य व्यावसायिकाने वाचायला हवा, असे त्याचे स्वरूप आहे. Www.vikhrolicucina.com वरून हा अहवाल डाउनलोड करता येईल.”

या सर्वेक्षणाच्या रचनाकार व लेखिका, तसेच ‘परफेक्ट हाईट कन्सल्टिंग एलएलपी’ या कंपनीच्या रशीना मन्शॉ गिल्डियाल म्हणाल्या, “गोदरेज फूड ट्रेंड्स रिपोर्ट हा या प्रकारचा एकमेवाद्वितीय अहवाल असून या उद्योगात त्याचे एक विशिष्ट स्थान आहे. गतवर्ष हे कधीही नव्हे इतके विचारशील, भीतीदायक आणि त्याचवेळी रोमांचक अशा स्वरुपाचे होते. 2020 या वर्षाकडे वळून पाहिले असता, त्यास दोन्ही – राक्षसी आणि चमत्कारिक – असे म्हणावे लागेल. आणि त्यातूनच 2021 हे वर्ष पुढे चालले आहे. या दरम्यान, खाद्यान्न उद्योग पूर्णपणे बदलला आहे! कोरोना साथीच्या काळात घरात व घराबाहेर जाऊन जेवण करण्याच्या दोन्ही पद्धतींमध्ये परिवर्तन झाले आहे. सर्व काही बदलले आहे आणि अनिश्चितता मात्र कायम आहे; परंतु, 2021 या वर्षाकडे पाहिले असता, मला व्यक्तिगतरित्या धक्का बसला आहे! गेल्या दशकात आपण भारतीय नागरिक खाद्यपदार्थांमधील प्रादेशिक नवजागराकडे वाटचाल करीत आहोत आणि याचा वेग 2020 मध्ये वाढला आहे. कोरोना साथीच्या काळात, सामूहिक शिक्षण आणि सर्जनशीलता यांचा संयोग होऊ लागला आहे. भारताच्या अन्न इतिहासाच्या उत्क्रांतीत आम्ही हा संपूर्ण नवीन अध्याय लिहीत आहोत!”

2021 या वर्षासाठीचे अंदाजित सर्वात अव्वल असे 12 फूड ट्रेंड्स:

1. नाश्ता वाढला जाईल, नव्या कल्पनांनुसार.

तज्ज्ञांच्या गृहितकांनुसार, अनोख्या पॅकेज्ड सोल्यूशन्सपासून ते नाविन्यपूर्ण पाककृतींपर्यंतचे खाद्यपदार्थांचे विविध प्रकार गृह-उद्योजक आणि रेस्टॉरंट्सकडून अधिकाधिक प्रमाणात शोधले जाणार आहेत.

2. चवींमध्ये वाढणारा चोखंदळपणा

2021मध्ये ग्राहक चोखंदळपणे नवीन चवी व त्यातील बारकावे शोधत राहतील; त्यायोगे वेगवेगळ्या चवींविषयीची भूक भागवत राहण्याचे प्रयत्न चालूच राहतील.

3. भारतीय किण्व्यांचे सखोल विश्लेषण

पारंपारिक शहाणपण, किण्वनापासून होणारे आरोग्याचे फायदे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पाककृतींची वाढती आवड या सर्व गोष्टींमुळे भारतातील किण्वित पदार्थांच्या समृद्ध भांडारात सखोल विश्लेषण होत आहे.

4. ‘घर की रसोई’ला मिळेल मध्यवर्ती स्थान

2021 मध्ये, घरातील आणि घराबाहेरील जेवणाचे निर्णय ठरतील घरामधल्या स्वयंपाकघरांमध्ये.

5. ‘होम डिलिव्हरी’मध्ये दिसेल अभूतपूर्व नावीन्यता

2021 मध्ये, आहार उद्योगातील होम डिलिव्हरीच्या क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडून येताना दिसतील, कारण टिकून राहण्यासाठी आणि नवीन ऑर्डरशी जुळवून घेण्याचे कार्य ते करीत असते.

6. जाणीवपूर्वक खाण्यास महत्त्व आल्याने, स्थानिक पदार्थांचा वाढेल वरचष्मा

अलीकडील काळात, आरोग्य, शाश्वतता आणि शेतकऱ्यांचे कल्याण या विषयांवरील चर्चा वाढू लागल्याने, ज्वारी, बाजरी यांसारख्या धान्यांचा समावेश ग्राहक अधिक प्रमाणात करू लागले आहेत. त्यायोगे, स्थानिक, देशी अशा धान्यांपासून चवींपर्यंत सर्व गोष्टींमधील ग्राहकांचे स्वारस्य वाढले असून या गोष्टींचे पुनरुज्जीवन झाले आहे.

7. भारतीय खाद्यपदार्थांना इन्स्टाग्रामवर मिळेल अतोनात महत्त्व

2021 मध्ये, भारतीय-प्रादेशिक पाककृती, देशी घटक पदार्थ, पारंपारिक पाककृती आणि पदार्थांविषयक कथा या सर्वांचा सुकाळ होईल. त्यांना अतोनात महत्त्व प्राप्त होऊन त्या ‘इन्स्टाग्राम सक्षम’ होतील!

8. ईशान्य भारतातील पाककृतींना मिळेल स्थानिक पदार्थांचा दर्जा

ईशान्येकडील राज्यांमधील पाकसंस्कृती गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने लोकप्रिय होऊ लागली आहे. पूर्वी कधीही न चाखलेल्या ईशान्य भारतीय पाककृतींची चव 2021 मध्ये सर्व भारतीय घेतील.

9. सक्रीय स्वास्थ्य, आहार यांच्यातून स्वतःची काळजी घेण्याला महत्त्व येऊन, त्यातून वैयक्तिक आहारातील निवडींना चालना

आयुर्वेदासंबंधी वाढती उत्सुकता व आवड, ‘न्यूट्रिजेनॉमिक्स’मधील वाढते कुतूहल आणि वैयक्तिकरित्या अनुकूल असलेले आहारांचे उपलब्ध पर्याय, यांतून असे दिसून येते की ग्राहक 2021 मध्ये वैयक्तिक जीवनशैलीसंबंधी निवडींना अनुकूल ठरणारे उपाय शोधतील.

10. भारतीय प्रादेशिक पाककृतींचे पुनरुत्थान

2021 मध्ये भारतीय प्रादेशिक पाककृतींचे पुनरुत्थान होईल आणि त्यामध्ये होम शेफ आणि मिनी एन्टरप्रायझेस यांचा मोठा वाटा असेल. ते ग्राहकांपुढे असे सर्व पदार्थ मांडतील व ग्राहक आपल्या आवडीप्रमाणे ते घेतील.

11. पाककलेत स्वावलंबनाचा होईल उदय – ‘डीआयवाय’

2020 या वर्षाने आपणा सर्वांना स्वयंपाकातील स्वावलंबन आणि डीआयवाय (स्वतःच सर्वकाही करणे) या गोष्टींना प्रवृत्त केले. ही सवय आता 2021 या वर्षात व त्यानंतरही कायम राहील.

12. ‘टेक मी हाफवे’ – स्वयंपाकघरांमध्ये हव्या उपयुक्त सुविधा

कन्व्हिनियन्स कुकिंग ही पद्धत गेल्या काही वर्षांमध्ये अनुकूल होत चालली असून तिला समाजमान्यताही मिळत आहे. 2021 मध्ये नवीन स्वरुपाच्या कार्यपद्धतींला सहाय्य होण्याच्या दृष्टीने, शिजवण्यासाठी तयार, खाण्यासाठी तयार अशी सोल्यूशन पुरविण्याकरीता अनेक उद्योगांमध्ये नाविन्यतेचा शोध घेणे सुरू आहे.

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड व तिच्या सहयोगी कंपन्यांचे उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट ब्रँड व कम्युनिकेशन्स विभागाचे प्रमुख सुजित पाटील यांनी ‘गोदरेज फूड ट्रेंड्स रिपोर्ट 2021’ या अहवालाचे प्रकाशन केले. या प्रसंगी रशीना मन्शॉ गिल्डियाल; शेफ रणवीर ब्रार; शेफ वरुण इनामदार; शेफ राखी वासवानी; शेफ, ओनोफाईल व कन्झर्व्हशनिस्ट शगुन मेहरा; अभिनेते, आहारविषयक लेखक, टिव्ही पर्सनॅलिटी कुणाल विजयकर; चॉकलेटियर व गुड हाऊसकिपींग प्रा. लि.च्या व्यवस्थापकीय संचालिका झेबा कोहली; आहार व प्रवासविषयक लेखिका व रेस्टॉरंट क्रिटिक रोशनी बजाज संघवी; लेखक, टीव्ही होस्ट आणि फूड क्रिटिक ओडेटे मस्करेन्हास; आहारविषयक लेखिका, इतिवृत्त लेखिका व सल्लागार अनुभूती कृष्णा; स्वतंत्र पत्रकार व आहारविषयक लेखिका रूथ डिसूझा प्रभू; लेखिका व पाककृती सल्लागार सई कोरान्ने-खांडेकर; आसामी खाद्य संशोधक व स्तंभलेखक काश्मिरी नाथ; आहारविषयक लेखक व ब्रँड सल्लागार कल्याण कर्माकर; स्वतंत्र पत्रकार व छायाचित्रकार अनिंद्य सुंदर बसू; ‘डाईनआऊट’मधील लक्झरी डायनिंग विभागाचे सरव्यवस्थापक अस्लम गफूर; पाककृती संशोधक व इतिवृत्त लेखिका शिवानी उनकर; ‘एफबीएआय’चे सहसंस्थापक समीर मलकानी आणि ‘एफबीएआय’च्या सहसंस्थापिका सलोनी मलकानी हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button